Viral Video : घरात आई एकमेव अशी व्यक्ती असते जी कधीच कोणती गोष्ट वाया जाऊ देत नाही. रात्रीची भाजी उरली असेल तर सकाळी त्याचा पराठा करून देणार. तुमच्या जुन्या कपड्यांना भांडीवालीकडे देऊन घरात एखादी उपयोगी वस्तू घेऊन येणार; अश्या अनोख्या पद्धतीत आई नेहमीच घरात सगळ्या गोष्टी सांभाळून घेत असते. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. बाहेर जोरदार पाऊस पडत असतो. आई हे बघते आणि पावसाच्या पाण्यात घरातील काही सामान धुऊन काढते, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
कमी अधिक प्रमाणात सगळीकडे पडणारा पाऊस वाया जातो. कारण-आपण पावसाचे पाणी साठवण्यासाठी योग्य ते नियोजन करत नाही किंवा त्याचा वेळीच उपयोग करत नाही. तर आज व्हायरल व्हिडीओत एका आईने पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून एक जुगाड केला आहे. व्हायरल व्हिडीओत जोरदार पाऊस पडत असतो. हे पाहून आई लगेच घरातील सोफा घेऊन येते आणि अंगणात ठेवते. पावसाखाली सोफा ठेवते आणि स्वछ करण्यासाठी त्यावर पावडर टाकते व ब्रशने घासताना दिसते. आई भरपावसात घरातील वस्तू स्वछ करताना दिसते आहे. आईने पावसाच्या पाण्याचा कशाप्रकारे उपयोग केला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…




व्हिडीओ नक्की बघा :
जोरदार पावसात धुऊन काढला घरातील सोफा आणि गालिचा :
पावसाचे पाणी साठवण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे. तसाच काहीसा विचार करून पावसाचे पाणी वाया न जाऊ देता आईने घरातील सामान धुण्यास काढले. जोरदार पाऊस पडताना पाहून आईच्या मनात घरातील वस्तू धुऊन काढण्याची योजना येते. आई घरातून सोफा आणते, त्यानंतर सोफ्यासोबत असणाऱ्या खुर्च्या आणि गालिचा घेऊन येते आणि एक एक करून तिन्ही गोष्टी पावसाखाली धुऊन काढते. सोफा, खुर्च्या, गालिचा स्वछ करण्यासाठी आई त्यावर पावडर घालते आणि ब्रशने घासून काढते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @wearemitu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेक महिला, ‘पावसात मीसुद्धा बाल्कनी धुवून काढते. ‘ ‘मी पावसाचा उपयोग गाड्या धुण्यासाठी करतो’ असे एक युजर सांगताना दिसत आहे आणि अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.