भारतासह जगभरात ८ मे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. मदर्स डेच्या निमित्ताने आज आपण अशा एका आईबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्याबद्दल ऐकून संपूर्ण जगाला धक्का बसला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या आईने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी मुलाला जन्म दिला. हे आजही जगभरातील डॉक्टरांसाठी एक कोडेच आहे. अवघ्या ५ वर्षांच्या वयात कोणीतरी मुलाला जन्म कसा देऊ शकतो, हे आजपर्यंत डॉक्टरांना समजलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही आई जगातील सर्वात तरुण आई म्हणून ओळखली जाते. या आईचे नाव लीना मदिना होते. लीना मदिना यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३३ रोजी पेरूमधील टिक्रापो येथे झाला. लीना जेव्हा फक्त ५ वर्षांची होती, तेव्हा अचानक तिच्या पोटाचा आकार वाढू लागला. सुरुवातीला लीनाच्या पालकांना वाटले की तिचे पोट ट्यूमरमुळे वाढत आहे. त्यानंतर ते तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून लीनाच्या आई-वडिलांना धक्काच बसला.

ऐकावं ते नवलच! महिलेला जडलंय भिंत खाण्याचं व्यसन; आठवड्याला खाते ‘इतके’ फूट भिंत

डॉक्टरांनी लीनाची तपासणी केली असता तिच्या पोटात मूल वाढत असल्याचे दिसून आले. हे जाणून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. लीना एवढ्या लहान वयात मुलाला जन्म कशी देईल, हे डॉक्टरांसमोरचे मोठे आव्हान होते. ते त्याच्या जीवासाठी धोकादायक होते. यानंतर तिला रुग्णालयातच ठेवण्यात आले. अखेर १४ मे १९३९ रोजी लीना मदिना यांनी वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी सिझेरियनद्वारे मुलाला जन्म दिला. ही बातमी त्या वेळी जगात वाऱ्यासारखी पसरली होती. ज्यावर कोणाचाही विश्वास बसणे कठीण होते.

लीनाची प्रसूती झाली तेव्हा तिच्या बाळाचे वजन २.७ किलो होते. रिपोर्टनुसार, या मुलाचे संगोपन लीनाच्या भावासारखे करण्यात आले. लीनाला प्रीकोशियस प्युबर्टी नावाची समस्या असल्याचे समोर आले. यामध्ये लहान वयात लैंगिक अवयव विकसित होतात. रिपोर्टनुसार, लीनाला वयाच्या ३ व्या वर्षी मासिक पाळी येऊ लागली होती.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

यानंतरही लीना मदिना इतक्या कमी वयात गरोदर कशी राहिली, असा प्रश्न पडत राहिला. दिल्या गेलेल्या उत्तरात पारंपारिक सणाचा उल्लेख आहे. लीना राहत असलेल्या गावात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या पारंपारिक उत्सवादरम्यान तरुण-तरुणी लैंगिक संबंध ठेवत असल्याचे सांगितले जाते. यानंतरही वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आई झालेल्या लीनासोबत कोणाचे नाते होते, हे आश्चर्यच आहे. ही कथा आजही एक गूढच आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mothers day 2022 a five year old girl gave birth to a baby you will be amazed to read the incident pvp
First published on: 07-05-2022 at 19:38 IST