सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपणाला पोट धरुन हसवतात, तर काही व्हिडीओ अंगावर शहारा आणतात. तर कधीकधी असे व्हिडीओदेखील व्हायरल होतात, ज्यातून आपणाला काहीतरी शिकायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीचा आणि तिच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आजी नातीला ब्रेकअप झालं म्हणून नाराज होऊ नको, असं सांगताना दिसत आहे आजीच्या या भन्नाट सल्ल्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
आजीने दिला भन्नाट सल्ला –




व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला आजी म्हणते, “मी म्हणते एखादा चांगला बॉयफ्रेंड शोध.” यावर मुलगी म्हणते, “कशासाठी? म्हणजे ब्रेकअप झाले आहे तर नवीन बॉयफ्रेंड शोधायचा?” यावर आजी म्हणते, “नवीन शोध, का करायचं, कशासाठी करायचं, तुजासाठी कोण दु:खी आहे, त्यापेक्षा आरामात मजा कर. दुसरा बॉयफ्रेंड शोध, एकच आयुष्य मिळालं आहे ते कशासाठी खेद करण्यासाठी? जर एखाद्याशी ब्रेकअप झालं असेल तर, जाऊदे त्याला, दुसरा बघ, एक जीवन मिळालं आहे, माहिती नाही भांडण झालं आहे तर काही दिवसांनी तुम्ही बोलालही पण त्यासाछी मूड का खराब करायचा, मुलांची कमतरता आहे का? एक गेला दुसरा आयुष्यात येईल आणि त्यापेक्षाही चांगले येईल.”
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
Kavya Mathur नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला हा आजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “मला देखील अशी एक आजी पाहिजे, यासाठी मी पात्र आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, “आजी एकदम बरोबर आहे. एक आयुष्य मिळाले, खेद का करायचा?” तिसरा युजरने लिहिलं आहे, “सीधी बात नो बकवास.” तर चौथ्याने “आजी नादखुळा! तुला कोण दु:खी करेल?”