Moto G37 Power launch with Moto Buds 2 specifications and hands-on review: स्मार्टफोनच्या बाजारात सध्या अधिक मेगापिक्सेल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि वेगवान प्रोसेसरच्या जाहिरातींचा गदारोळ सुरू असताना मोटोरोलाने सामान्य ग्राहकांच्या नेमक्या गरजा ओळखून Moto G37 Power आणि Moto Buds 2 हे दोन भन्नाट प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. दिखाऊपणापेक्षा वापरकर्त्यांच्या प्रत्यक्ष सोयीला प्राधान्य देणारी ही जोडी ग्राहकांच्या पसंतीस उतरेल का? पाहूया याचा सविस्तर रिव्ह्यू.

दिवसभर चालणारी बॅटरी

बहुतेकांना दिवसभर चालणारी बॅटरी हवी असते. फोन वारंवार हँग होऊ नये अशी अपेक्षा असते. स्पीकर चांगले असावेत, कॅमेऱ्याने समाधानकारक फोटो यावेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोन वापरताना अनावश्यक जाहिराती किंवा बिनकामाची अॅप्स यांनी त्रास देऊ नये. मोटोरोलाने नव्या Moto G37 Power आणि Moto Buds 2 या उत्पादनांद्वारे याच गरजांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा Moto G37 Power बद्दल समजून घेऊया. या फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तब्बल ७००० mAh क्षमतेची बॅटरी. सध्या स्मार्टफोन उत्पादक कमी जाडीचे सडपातळ आणि आकर्षक फोन तयार करण्याच्या नादात बॅटरीच्या क्षमतेशी तडजोड करताना दिसतात. त्याच्या उलट मोटोरोलाने या फोनमध्ये बॅटरीलाच केंद्रस्थानी ठेवले आहे.

हेही वाचा

चार्जर घेऊन फिरण्याची गरज नाही

प्रत्यक्ष वापरात ही बॅटरी दोन दिवस सहज टिकू शकते, असे रिव्ह्यूदरम्यान लक्षात आले. सतत फोनवर काम करणारे पत्रकार, प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थ्यांपासून ते ग्रामीण भागातील वापरकर्त्यांपर्यंत अनेकांसाठी ही बाब महत्त्वाची आहे. पॉवरबँक किंवा चार्जर घेऊन फिरण्याची गरज त्यामुळे कमी होते, हा या फोनचा सर्वात मोठा फायदा आहे.

Moto G37 Power smartphone review in Marathi | Moto Buds 2 price and features India | मोटो जी३७ पॉवर ७००० एमएएच बॅटरी मोबाईल | मोटो बड्स २ इयरबड्स रिव्ह्यू मराठी
झूम न करता टिपलेले फोटो Moto G37 Power वर चांगले येतात.

साधा व सुंदर इंटरफेस

फोनचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे अँड्रॉइड अनुभव. अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये काही अॅप्स आधीपासूनच प्री- लोडेड असतात. वापरकर्त्यांना नको असलेल्या जाहिराती किंवा नोटिफिकेशन्स सतत येत राहतात. Moto G37 Power या बाबतीत वेगळा ठरतो. इंटरफेस साधा, सुंदर आणि वापरण्यास सोपा असा आहे.

मध्यमवर्गीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारा फोन

कामगिरीच्या बाबतीत हा फोन मध्यमवर्गीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारा आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, वेब ब्राउझिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि दैनंदिन मल्टिटास्किंग यासाठी कोणतीही अडचण जाणवत नाही. मात्र उच्च दर्जाच्या गेमिंगची अपेक्षा असणाऱ्यांसाठी हा फोन नाही, त्याचा प्रोसेसर चांगला असला तर गेमिंगसाठी याहून अधिक बाबी आवश्यक असतात.

Moto G37 Power smartphone review in Marathi | Moto Buds 2 price and features India | मोटो जी३७ पॉवर ७००० एमएएच बॅटरी मोबाईल | मोटो बड्स २ इयरबड्स रिव्ह्यू मराठी

डिस्प्लेमध्ये तडजोडी

डिस्प्लेच्या बाबतीत मात्र काही तडजोडी दिसून येतात. फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट असला तरी AMOLED ऐवजी LCD पॅनल वापरण्यात आले आहे. त्यामुळे रंगांची दृश्यमानता, बाहेरच्या प्रखर प्रकाशातही स्पष्टपणे दिसणे या बाबतीत काही स्पर्धकांच्या तुलनेत हा फोन तसा कमी पडतो. आजच्या बाजारात अनेक प्रतिस्पर्धी AMOLED स्क्रीन देत असताना हा मुद्दा काही ग्राहकांसाठी महत्त्वाचा असू शकतो.

मेमरी कार्ड स्लॉट व एफएम परतले

मोटोरोलाने काही महत्त्वाच्या सोयी या मॉडेलच्या माध्यमातून परत आणल्या आहेत. त्यांनी ऑडिओ जॅक, मेमरी कार्डसाठीचा स्लॉट आणि एफएमची सोय या मॉडेलमध्ये परत आणली आहे. या तिन्ही बाबी वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहेत, असे लक्षात आल्यानेच त्या परत आणल्याचा कंपनीचा दावा आहे. वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेतल्या तर माटोरोलाच्या दाव्यामध्ये तथ्य आहे, असे लक्षात येते.

Moto G37 Power smartphone review in Marathi | Moto Buds 2 price and features India | मोटो जी३७ पॉवर ७००० एमएएच बॅटरी मोबाईल | मोटो बड्स २ इयरबड्स रिव्ह्यू मराठी
Moto G37 ची मायक्रो लेन्स उत्तम काम करते

कॅमेऱ्याच्या बाबतीत मात्र…

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, Moto G37 Power चांगले काम करतो; हा ५० मेगापिक्सेल क्वाड कॅमरा आहे, पण तो उत्कृष्ट म्हणता येणार नाही. दिवसाच्या उजेडात फोटो समाधानकारक येतात. रंग नैसर्गिक दिसतात आणि तपशील अनेकदा तेवढे चांगले टिपले जात नाहीत, असा अनुभव हाताळणीदरम्यान आला. सोशल मीडियासाठी किंवा वैयक्तिक आठवणी जतन करण्यासाठी हा कॅमेरा पुरेसा आहे. मात्र कमी प्रकाशात टिपलेल्या छायाचित्रांमध्ये अपेक्षित दर्जा मिळत नाही. नॉईज वाढतो आणि तपशील कमी होतात. त्यामुळे छायाचित्रण हा मुख्य उद्देश असेल, तर बाजारात इतर काही पर्याय अधिक आकर्षक ठरू शकतात. यात एक फ्रेम मॅचची सोय देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी आपला फोटो टिपायचा असेल तर बॅकग्राऊंड पॉज करत या मोडवर हवी ती व्यक्ती अॅडजस्ट करत फोटो टिपता येतो. म्हणजेच एका फ्रेममध्ये हवी तशी दुसरी फ्रेम टिपता येते. पण मुळात फोटोमध्ये तपशील चांगले टिपले जात नसल्याने सोय चांगली असली तरी त्यात फार मजा नाही.

गोरिला ग्लास

फोनची रचना मजबूत आहे. IP64, Gorilla Glass आणि टिकाऊपणाचे सर्टिफिकेशन यामुळे फोन दैनंदिन वापरातील धक्के आणि प्रतिकूल परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. दीर्घकाळ फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब निश्चितच महत्त्वाची आहे.

Moto G37 Power smartphone review in Marathi | Moto Buds 2 price and features India | मोटो जी३७ पॉवर ७००० एमएएच बॅटरी मोबाईल | मोटो बड्स २ इयरबड्स रिव्ह्यू मराठी
Moto G37 मध्ये नाईड मोडवर टिपलेल्या फोटोंमध्ये पूर्वीपेक्षा थोडी सुधारणा पाहायला मिळते.

Moto Buds2

सध्या वायरलेस इयरबड्सच्या बाजारात प्रचंड स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत Moto Buds 2 या इयरबड्सचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किंमतीच्या तुलनेत मिळणाऱ्या सुविधा. या इयरबड्समध्ये सक्रिय ध्वनी नियंत्रण (ANC), गेमिंग मोड आणि हाय-रेझ ऑडिओ यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. काही वर्षांपूर्वी ही वैशिष्ट्ये केवळ महागड्या उत्पादनांमध्येच दिसत होती. आज ती तुलनेने कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत.

आवाजाच्या गुणवत्तेच्या बाबतीत Moto Buds 2 हे सर्वसामान्य ग्राहकांना नजरेसमोर घेऊन तयार केलेले उत्पादन आहे. चित्रपट किंवा वेब सिरीज पाहताना, संगीत ऐकताना हा अनुभव आनंददायी असतो. मात्र संगीताचे बारकावे टिपणाऱ्या किंवा स्टुडिओ दर्जाचा ध्वनी अनुभव शोधणाऱ्या ऑडिओप्रेमींना हे इयरबड्स काही प्रमाणात मर्यादित वाटू शकतात. सूक्ष्म तपशीलाच्या बाबतीत काही विशेष ऑडिओ ब्रँड्स अजूनही पुढे आहेत. मोटोरोलाचा फोन वापरणाऱ्यांसाठी Moto Buds 2 अधिक आकर्षक ठरतात. फोन आणि इयरबड्स यांच्यातील समन्वय सहज असतो.

उपयुक्त अनुभवावर भर

या दोन्ही उत्पादनांचा एकत्रित विचार केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. मोटोरोलाने येथे ‘सर्वोत्कृष्ट स्पेसिफिकेशन’ देण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर त्याऐवजी त्यांनी ‘उपयुक्त अनुभव’ देण्यावर भर दिला आहे. Moto G37 Power हा सर्वोत्तम कॅमेरा फोन नाही. तो सर्वात वेगवान गेमिंग फोनही नाही. त्याचप्रमाणे Moto Buds 2 हे ऑडिओफाइल्ससाठी अंतिम पर्याय नाहीत. मोठी बॅटरी, क्लिन सॉफ्टवेअर, चांगले स्पीकर्स, आणि मजबूत बांधणी यामुळे Moto G37 Power हा अनेकांसाठी विश्वासार्ह साथीदार ठरू शकतो. स्पेसिफिकेशन्सच्या शर्यतीत सर्वात पुढे नसले तरी दैनंदिन वापरातील सोयी आणि विश्वासार्हतेच्या कसोटीवर Moto G37 Power आणि Moto Buds 2 ही जोडी नक्कीच उठून दिसते. चमकदार जाहिरातींपेक्षा प्रत्यक्ष वापराला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक विचार करण्याजोगा पर्याय आहे.

किंमत- Moto g37 power 4/128GB: Rs 15,999
Moto g37 power 8/128GB: Rs 18,999