Mountain Trekking Couple Video : पावसाळ्यात बरेच लोक ट्रेकिंगसाठी डोंगर, गडकिल्ल्यांवर जातात. तिथे मजेशीर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यातील अनेक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या पावसाळ्यात डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या एका जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना हसू आवरणं अवघड झालायं. ज्यावर अनेकजण डोंगरावर फिरताना रिस्क नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया देत आहेत.
पावसाळ्यात उंच गडकिल्ले आणि डोंगर दऱ्यांमध्ये फिरताना पाय घसरून पडण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यात काहीवेळा ट्रेकर्सला गंभीर दुखापत होते, काहीवेळा मृत्यूच्या घटना घडतात. या घटनांपासून वाचण्यासाठी व्हिडीओतील जोडप्याने कमाल जुगाड शोधलाय. या जुगाडमुळे काही घडले तर एकाबरोबर नाही तर दोघांबरोबर घडेल.
व्हिडीओमध्ये एक जोडपे डोंगरात ट्रेकिंग करताना दिसत आहे. यादरम्यान, पती आपला हात वर करतो आणि दाखवतो की त्याने पत्नीच्या ओढणीने स्वतःचा आणि पत्नीचा एक हात बांधला आहे. आता त्याच्या याच कृतीमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पती-पत्नीचा हा मजेशीर व्हिडीओ @magbhu55 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एका जोडप्याने डोंगरावरील ट्रेकदरम्यान ओढणीने आपले हात बांधले.’
हा व्हिडीओ आता लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझरने लिहिले, “आम्ही गेलो तर दोघे एकत्र जाऊ.” दुसऱ्या युझरने लिहिले, “या भागात हातकडीचा व्यवसाय तेजीत येऊ शकतो.” तिसऱ्या युझरने लिहिले, “जेव्हा दोघांचा एकमेकांवर विश्वास नसतो, पण ट्रेकला जायचं असतं.” चौथ्या युझरने लिहिले- “२-स्टेप व्हेरिफिकेशन.”
