Theft Viral video : कोणतेही काम करण्याआधी किंवा कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी देवाचे आशीर्वाद घेतले जातात. आतापर्यंत तुम्ही सामान्य लोकांना अशाप्रकारे करताना पाहिलं असेल, पण चोरांना चोरी करण्याआधी आशीर्वाद घेताना पाहिलं आहे का? तुम्हाला हे वाचताना विचित्र वाटेल, पण प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे, जी पाहून तुम्हीही म्हणाल काय अजब चोर आहे हा! एका दुकानात चोर चोरी करण्यासाठी शिरले, पण त्यानंतर असे काही घडले की, चोर आधी देवाच्या पाया पडू लागला. यानंतर त्याने दुकानातील पैशांच्या लॉकरवर हात साफ केले, या घटनेचा व्हिडीओ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही घटना मध्य प्रदेशातील बैतूलमधील आहे, जिथे चोरांनी जवळपास ११ दुकानांचे कुलूप तोडून चोरी केली. यावेळी एका दुकानात चोरी करताना चोरट्यांबरोबर असे काही घडले, जे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यावेळी चोरट्यांचे वेगळे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

देवाची प्रतिमा चोरट्याच्या पायाजवळ पडली अन्…

घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन चोरटे दुकानाचे टाळे तोडून आत शिरत होते, पण दुकानाच्या शटरसमोर मोठं कपाट लावलं होते, जे ठकलणं चोरट्यांना नीट जमत नव्हतं. मात्र, एका चोरट्याने लाथेने ते कपाट आत ढकलून दुकानात शिरण्यासाठी जागा बनवली. यावेळी कपाटावर ठेवलेली देवाची प्रतिमा खाली कोसळून चोरट्याच्या अगदी पायाजवळ पडली, जी त्याने दुकानात शिरताच आदराने उचलली, कपाळाला लावली आणि माफी मागत नमस्कार केला आणि पुन्हा कपाटावर ठेवली. यानंतर त्या कपाटाचे ड्रॉवर फोडून होते नव्हते तेवढे सर्व पैसे जमा केले. इतक्यात दुसरा एक चोर तिथे आला, दोघे मिळून दुकानात इतर ठिकाणी कुठे पैसे लपवले आहेत का हे शोधू लागले.

फुटपाथवरुन चालत होती, तितक्यात जमिनीखालून झाला भीषण स्फोट अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Free Aadhaar update: उरले फक्त ४ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;

या घटनेवर पोलिसांनी माहिती दिली की, चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणी तपास सुरू आहे. चोर दुकानाच्या लॉकरमधील चिल्लर व रोख रक्कम चोरी करून पसार झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता संबंधित परिसरातील सुरक्षेबाबत लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकांनी एका संशयिताला पकडले असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पण, पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader