मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. येथील बलकवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धावत्या बसमधील कंडक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ३० सेकंदांचा आहे, ज्यामध्ये मृत्यूपुर्वी कंडक्टरला होणाऱ्या वेदना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये, बसमध्ये कंडक्टरच्या शेजारी बसलेले एक वृद्ध जोडपे कंडक्टरला होणारा त्रास पाहून अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे. यावेळी वयस्कर व्यक्ती कंडक्टरला हात लावून मदत करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा काहीही फायदा होत नाही. ही घटना आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मगरखेडी गावाजवळ घडल्याचं सांगण्यात येत आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Yavatmal, Policeman, Dies, Heart Attack, running practice,
यवतमाळ : धावण्याच्या सरावादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

हेही वाचा- लुडो खेळता खेळता जावयाचा सासूवर जडला जीव, अंधाऱ्या रात्री भेटायला जाताच गावकऱ्यांनी पकडला अन्…

दरम्यान ४० वर्षीय कंडक्टर अंतिम कुमावत यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बस चालकाने त्यांना ५ किमी अंतरावर असणाऱ्या बरवानी जिल्ह्यातील ठिकरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ठिकरी स्टेशन प्रभारी भवानी राम वर्मा यांनी सांगितले की, ही घटना २० मे रोजी घडली आहे. दरम्यान पोलिसांनी कंडक्टरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तर डॉक्टरांनी या घटनेचे कारण कार्डिअ‍ॅक अरेस्ट असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा- “तुझ्या आई-वडिलांनी रडावे…” बाईकवर विचित्र स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांची अनोखी समज; मजेशीर Video व्हायरल

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना खरगोन जिल्ह्यातील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असून याबाबतची माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. घटनेनंतर चालक बससह रुग्णालयात पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कंडक्टरवर प्राथमिक उपचार सीपीआर केले. मात्र कंडक्टर अंतिम कुमावत यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. कुमावत हे धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यातील नर्मदा नगरचे रहिवासी होते. तर कंडक्टरच्या नातेवाईकांचे त्यांना यापूर्वी कोणताही मोठा आजार नसल्याचं सांगितलं आहे.