Ms Dhoni Bike Riding Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडतोच. पण धोनी चाहत्यांची मनं जिंकण्यातही माहिर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. कधी रांचीच्या रस्त्यावर विंटेज कारची राड करताना तर कधी स्पोर्ट्स बाईकवर फिरताना धोनी कॅमेरात कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे. आताही धोनीचा रांची येथील एक जबरदस्त व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. धोनीनं एका युवा खेळाडूला दुचाकीवर लिफ्ट दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांची मनं जिंकत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत धोनी त्याच्या दुचाकीवर एका युवा खेळाडूला लिफ्ट देताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानावर सराव संपल्यानंतर धोनी घरी जाण्याच्या तयारीत असतो. त्याचदरम्यान धोनीचा जबरा फॅन धोनीसोबत बाईक रायडिंग करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दुचाकी चालवताना धोनीनं हेल्मेट घातल्याचं दिसत आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना धोनीचा चेहरा दिसत नाही. धोनीनं यामाहा RD350 बाईकवर या युवा खेळाडूला लिफ्ट देऊन तमाम क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. धोनीला स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याची प्रचंड आवड आहे. कारण धोनीकडे महागड्या गाड्यांचा मोठं कलेक्शन असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.




इथे पाहा धोनीचा सुंदर व्हिडीओ
आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमनाची अपेक्षा
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जन २०२३ च्या आयपीएल हंगामात पुन्हा चॅम्पियन बनली. आयपीएल २०२४ मध्ये खेळणार की नाही, याबाबत धोनीनं माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं नाही. परंतु, चाहत्यांना धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात पुन्हा पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. धोनी जिममध्ये वर्कआऊट करत असतानाही अनेकदा कॅमेराबद्ध झाल्याचं पाहायला मिळालं आहे.