धोनीची पत्नी साक्षीने शेअर केले क्रिकेटर्सच्या मुलांसोबतचे आनंदी क्षण

डीजे ब्रावोने दिलेल्या पार्टीतील धम्माल

धोनीची पत्नी साक्षीने धवन आणि ब्रावो यांच्या मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नेहमीच ती पती आणि आपली मुलगी झीवा यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. आता तिने वेस्ट इंडिज आणि भारतीय सलामवीराच्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला सध्या चांगली पसंती मिळताना दिसते आहे. वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघासोबत दौऱ्यावर असलेल्या धोनीसोबत त्याची पत्नी आणि मुलगी देखील आहे. रविवारी भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामन्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी डीजे ब्रावोने खास मेजवानीचे आयोजन केले होते.

https://www.instagram.com/p/BVzWyo7l7R8/

या पार्टीमध्ये भारतीय खेळाडूंसह शिखर धवन आपल्या मुलासोबत सहभागी झाला होता. तर धोनीने पत्नी साक्षी आणि मुलगी झीवासोबत मेजवानीचा आस्वाद घेतला. यावेळी साक्षीने बराच वेळ ब्रावोचा मुलगा ज्युनियर ब्रावो आणि धवनचा मुलगा झोरावर याच्यासोबत वेळ घालवला. तिने या मुलांसोबतचा फोटो शेअर केला असून, ही दोन माझी मुले आहेत, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. धोनीला एक मुलगी आहे हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांना गोंधळ उडू नये म्हणून तिने ज्यूनियर धवन आणि ज्युनियर ब्रावो असा उल्लेख देखील केला आहे. साक्षी या दोन मुलांना आपल्या मुलांप्रमाणेच मानते, असे या फोटोतून दिसून येते. फोटोत धवन आणि ब्रावोच्या मुलाचा अंदाज भन्नाट असाच आहे.

धोनी आणि ब्रावो यांच्यातील चांगले संबंध आहेत. आयपीएलमध्ये ब्रावो धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. धोनीला तो मोठ्या भावाप्रमाणे मानतो. नुकताच त्याने धोनी त्याची मुलगी झीवा आणि आपल्या आईचा पार्टीतील फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना मोठा भाऊ धोनी माझ्या घरी आला आहे, असे कॅप्शन त्याने दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ms dhonis wife sakshi clicked pleasant time with cricketers son

ताज्या बातम्या