scorecardresearch

Premium

मुकेश अंबानी, सद्गुरू यांच्या नावे होतोय घोटाळा; ‘अशी’ व्हायरल पोस्ट तुमच्यापर्यंत आली तर लगेच करा तक्रार

Scam Alert: या घोटाळ्यासाठी अगदी मुकेश अंबानींपासून ते अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे वापरण्यात आली होती. याबाबत तपास केला असता काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत

Mukesh Ambani Sadguru Video used to Scam People With Indian Actress Photos If You see These Viral Posts report Immediately
घोटाळ्यासाठी मुकेश अंबानींपासून ते अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे वापरण्यात आली होती. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अंकिता देशकर

Fraud Alert: लाईटहाऊस जर्नालिज्मला काही व्हिडिओ सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असल्याचे आढळले. विशेषत: टेलिग्राम आणि फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सेलिब्रिटीज काही सामान्य माणसांच्या गुंतवणुकीच्या योजनांना व ऑफर्सना समर्थन देत आहेत असे दाखवण्यात येत होते. काही ठिकाणी अगदी मुकेश अंबानींपासून ते अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे वापरण्यात आली होती. याबाबत तपास केला असता काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तुम्हीही ही माहिती पूर्ण वाचून सतर्क व्हा.

A special watch made from 12 meteor rocks
Video : १२ उल्कांच्या तुकड्यांपासून तयार केलं खास घड्याळ; किंमत ऐकून व्हाल चकित…
lalbagh raja celebs are getting vvip treatment common people are being mistreated
देवाच्या दारात भेदभाव? लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत सेलिब्रिटींना VVIP दर्शन अन् सामान्यांना धक्काबुक्की; Video Viral
mother buffalo sacrifice viral video
शेवटी आई ती आईच..! बाळाला वाचवण्यासाठी म्हशीने स्वतःचा जीव लावला पणाला, एकटी सिंहांच्या कळपाला भिडली पण…
rehman-concert-chennai
ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, ढिसाळ नियोजन; चाहत्यांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Sona Super हिने उद्योगपती मुकेश अंबानी एका गुंतवणूक योजनेची गॅरंटी देत असल्याचे दाखवणारा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.

आम्हाला असे आणखी काही व्हिडिओ देखील सापडले आहेत ज्यांनी गुंतवणूक योजनेचे समर्थन केले आहे. एका व्हिडिओमध्ये एक पोलिस अधिकारी सुद्धा सदर गुंतववणूक प्लॅन हा सरकारी योजना असल्याचे सांगत बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये सूरज शर्मा नावाच्या आणखी एका व्यक्तीच्या गुंतवणुकीचे लोकप्रिय सेलिब्रिटींनी कसे समर्थन केले आहे हे दाखवण्यात आले आहे.

अन्य एका व्हिडिओमध्ये ईशा फाऊंडेशनचे प्रमुख सद्गुरु हे लैला राव यांचे समर्थन करताना दिसतात.

तपास:

आम्ही पहिल्या व्हिडिओसह आमची तपासणी सुरू केली, जिथे मुकेश अंबानी एका महिलेला आणि तिच्या गुंतवणूक योजनेचे समर्थन करताना दिसत होते.

मुकेश अंबानींचा आवाज मानवी नसून एआय निर्मित वाटत होता. म्हणून आम्ही व्हिडिओंमधून मिळवलेल्या फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. आम्हाला ABP Live वरील बातमीत व्हिडिओमध्ये वापरलेली मूळ प्रतिमा सापडली.

चित्रात नीता अंबानी व मुकेश अंबानी यांनी व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे समान कपडे घातले होते हे दिसून आले यावरून हे स्पष्ट होते की फोटो डिजिटली एडिट केलेला आहे. तर मुकेश अंबानींचा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वी रिलायन्सच्या एजीएममधील त्यांच्या भाषणातील होता. व्हायरल व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेला टाय हा मूळ व्हिडीओमध्ये दिसल्याप्रमाणेच आहे. यासंदर्भात खात्रीसाठी आम्हाला NDTV YouTube चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ सुद्धा सापडला.

व्हिडिओमध्ये सोना अग्रवालला प्रकल्पाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्याबद्दल सांगितले आहे जिथे प्रत्येकजण जोखीम न घेता कमाई करू शकतो. व्हिडिओमध्ये लोकांना सोनाच्या टेलिग्राम चॅनेलवर जाण्यास सांगितले आहे. याबाबत पडताळणीसाठी आम्ही प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजचे पीआरओ, फ्रँको विल्यम्स यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल व्हिडिओ आणि दावा खोटा आहे आणि चेअरमन मुकेश अंबानी यांच्या आवाजात एडिट करून बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आम्ही सोना सुपरचे फेसबुक पेज देखील स्कॅन केले, आम्हाला तिच्या प्रोफाइलवर काहीही विश्वसनीय आढळले नाही.

ग्राहक तक्रार न्यायालयाच्या वेबसाइटवर आम्हाला १० सप्टेंबर २०२३ रोजी सोना अग्रवालच्या नावाखाली सायबर गुन्ह्याची नोंद झालेली दिसली.

आम्हाला असेही आढळून आले की या घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या महिलेचे फोटो हे एका फॅशन इन्फ्लुएसर सुखनीत वाधवाचे आहे.

आम्हाला नीता अंबानींच्या चेहऱ्यावर फोटोशॉप केलेली सुखनीतचे फोटो देखील सापडले.

त्यानंतर आम्ही दुसर्‍या व्हिडिओकडे वळलो, ज्यात एक पोलिस निरीक्षक एका योजनेबद्दल बोलताना दिसत होते जिथे सरकारने ट्रेडिंग द्वारे पैसे कमवण्याचा मार्ग सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हा व्हिडीओ ‘नीरज सरना इन्स्पेक्टर’ नावाच्या पोलिस अधिकाऱ्याचा होता जे त्यांच्या नेमप्लेटवर स्पष्टपणे दिसत होते. आम्हाला कळले की अधिकारी चंदीगड (मणी माजरा) येथे तैनात आहेत आणि आम्ही त्यांना फोनवर संपर्क केला. इन्स्पेक्टर नीरज सरना यांनी आम्हाला माहिती दिली की व्हिडिओ एडिट करण्यात आला असून व्हिडिओमधील आवाज त्यांचा नाही. त्याने या व्हिडिओची आधीच तक्रार केली आहे. ते म्हणाले, हा व्हिडिओ एका पत्रकार परिषदेचा होता आणि त्याने ट्रेडिंगचे समर्थन केले नाही.

त्यानंतर आम्ही दुसरा व्हिडिओ शोधला जिथे ‘इंडिया टुडे’चा लोगो वापरण्यात आला होता आणि असा दावा केला जात होता की एका भारतातील महिलेने मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मदत केली. अध्यात्मिक गुरू सद्गुरुंचा व्हिडिओ याला समर्थनार्थ वापरण्यात आला होता. पुन्हा या व्हिडिओमध्ये वापरकर्त्याने लोकांना टेलिग्राम चॅनेलद्वारे कनेक्ट होण्याचे आवाहन केले.

आम्ही प्रोफाइलवरून एक पोस्ट निवडली ज्यात तो लोकांना त्याचे टेलिग्राम चॅनेल सामील होण्यास सांगत होता.

आम्हाला ग्राहक तक्रार न्यायालयाच्या वेबसाइटवर सूरजविरोधात तक्रार आढळली.

आम्हाला ईशा फाउंडेशनच्या पेजवर हा व्हिडिओ ‘घोटाळा’ असल्याचे सांगणारी पोस्ट देखील सापडली.

पोस्टमध्ये म्हटले आहे की सद्गुरूंचा आवाज एआय वापरून डब करण्यात आला आहे आम्ही पुढच्या व्हिडिओवर गेलो, जिथे लैला राव यांना सद्गुरुंनी समर्थन दिले होते.

हा व्हिडिओ इतर व्हिडिओंसारखाच होता, आम्हाला कळले की या व्हिडिओमध्ये वापरलेले फोटो अभिनेत्री स्मृती खन्ना हिचे आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे की या जाहिराती तिच्या नावावर चालत आहेत, तिने लोकांना अशा कोणत्याही घोटाळ्याला बळी पडू नका असे सांगितले गेले आहे.

आम्हाला लैला राव यांच्या नावाने ग्राहकांची तक्रार देखील आढळली.

हे ही वाचा<< नॅशनल क्रश साई पल्लवीने बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहते म्हणतात, “तिने सिद्ध केलं प्रेमाला..” नीट वाचा पोस्ट

निष्कर्ष: हे सर्व व्हिडिओ घोटाळेबाजांनी बनवले आहेत आणि ते टेलिग्राम आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. अशा कोणत्याही संशयास्पद घोटाळ्यात गुंतवणूक करू नये.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukesh ambani sadguru video used to scam people with indian actress photos if you see these viral posts report immediately svs

First published on: 21-09-2023 at 18:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×