संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशभक्तांचा गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. १९ सप्टेंबरला मंगळवारी गणरायाचं आगमन झालं. अशातच सर्वात लोकप्रिय असणाऱ्या लागबागच्या राजाच्या दर्शनासाठी तमाम गणेशभक्त मुंबईच्या रस्त्यांवर पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गतवर्षीच्या व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कारण प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाचं गेल्यावर्षी दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटांची माळ करून गणपती चरणी वाहिली होती. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला असून अंबानी यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसतंय, मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अंबानी कुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेत प्रार्थना करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतय. एकीकडे अॅंटिलियामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच व्हायरल झालेल्या या जुन्या व्हिडीओनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हिडीओत पाहू शकता की, लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी मुकेश अंबानी यांनी निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. अंबानी कुटुंबियांनी लालबागच्या राजाच्या मंडपात असलेल्या पंडितांचीही भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

मात्र, मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या चरणी काय अर्पण केलं होतं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कारण अंबानी यांनी गणपती चरणी दोन हजार रुपयांच्या नोटांची माळ वाहिल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलंय. हा व्हिडीओ गतवर्षीचा असून अंबानी यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. कारण, मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाला २ हजारच्या नोटांचा हार दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. सरकारने २००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली? आणि तुम्ही त्याच नोटांचा हार चढवला, असा सवाल नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘नको मला बंगला नको, गाडी पाहिजे…’; नऊवारी साडीत महिलेचा दुबईत हटके डान्स, नवराही झाला लाजून लाल

हा व्हिडिओ ‘mukeshambanirilLalbaug’ या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. युजर्सनी या व्हिडिओवर भरभरून कमेंटही केल्या आहेत. तर काही यूजर्स प्रश्न विचारतानाही दिसले. एका युजरने कमेंट केली की सरकारने २००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली? आणि तुम्ही त्याच नोटांचा हार चढवला. यावर एकाने हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा असल्याचं उत्तर दिलंय.

Story img Loader