संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशभक्तांचा गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. १९ सप्टेंबरला मंगळवारी गणरायाचं आगमन झालं. अशातच सर्वात लोकप्रिय असणाऱ्या लागबागच्या राजाच्या दर्शनासाठी तमाम गणेशभक्त मुंबईच्या रस्त्यांवर पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गतवर्षीच्या व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कारण प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाचं गेल्यावर्षी दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटांची माळ करून गणपती चरणी वाहिली होती. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला असून अंबानी यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
मुकेश अंबानी सोशल मीडियावर झाले ट्रोल! लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
Video viral: मुकेश अंबानी सोशल मीडियावर का होत आहेत ट्रोल?
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-09-2023 at 14:24 IST
TOPICSगणेशोत्सव २०२४Ganeshotsavट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Videoसोशल मीडियाSocial Media
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani troll worship lord ganesha video of offering garland 2 thousand rupee notes went viral srk