Viral video: सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. यात तुम्हात काही मनोरंजक व्हिडीओ तर काही धक्कादायक व्हिडीओ पाहिला मिळतात. छोट्या गोष्टीपासून मोठ मोठी भांडणाचे व्हिडीओही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरतात. याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणी किंवा महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतोत. मुंबई लोकल ट्रेनमधील हाणामारीचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेच असतील. मात्र सध्या व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये दोन तरुण भांडता भांडता थेट रुळावर उतरले. दरम्यान या हाणामारीचं कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल.

व्हिडिओनुसार, हा प्रकार स्टेशनवर गर्दी असताना घडला. दोन्ही तरुण अचानक भांडण करत असतानाच प्लॅटफॉर्मवरून खाली उतरले आणि रूळांवरच एकमेकांवर मारहाण करू लागले. उपस्थित प्रवाशांना ही घटना पाहताच धक्का बसला. यावेळी काहींनी ही घटना त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केली. तर काही नागरिकांनी पुढाकार घेत दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दोन व्यक्तींनी धाडस दाखवत रूळांवर उतरून त्या तरुणांना वेगळं केलं. त्यापैकी एका व्यक्तीने परिस्थितीची गंभीरता ओळखून दोन्ही बाजूंनी ट्रेन येत असल्याचं लक्षात घेतलं आणि एका तरुणाला उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं. या धाडसी कृतीमुळे मोठा अपघात टळला. मात्र, प्लॅटफॉर्मवर आल्यानंतरही दोघांमधील वाद काही थांबला नाही, आणि ते पुन्हा भांडू लागल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमधील वाद एका मुलीवरून झाल्याचं समोर येत आहे. तरीही, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

पाहा व्हिडीओ

प्रेम ही खरं तर सहजसुलभ भावना आहे. आजकाल लोक प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. प्रेमासाठी विरोध, मरण पत्करण्याचीदेखील लोकांची तयारी असते. अगदी अशाप्रकारच्या घटनांविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. मात्र हेच प्रेम जेव्हा भयानक रूप धारण करतं तेव्हा सगळं संपत. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ parivartan_news नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.