Kandiwali Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच मंबईतील कांदिवली स्टेशनवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल.

आजपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो, तर काहींना गंभीर दुखापतही होते. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय,जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मुंबईतील कांदिवली स्टेशनवर एका २० वर्षीय तरुणीने एका महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवले.
​सुदैवाने, पीडित महिलेने आरडाओरडा केल्यामुळे आणि उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे त्या चोरट्या तरुणीला कांदिवली स्टेशनवरच पकडण्यात आले आहे. सध्या ती पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रेल्वे स्टेशन परिसरातील नेहमीची गर्दी दिसतेय. अशावेळी अचानक एक महिला आरडाओरडा करताना दिसते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचं लक्षात येताच तिला संशय आला. यावेळी काही प्रवाशांनी आणि स्थानिकांनी संशयित तरुणीचा पाठलाग करून तिला पकडलं आणि तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mayuri0204 नावाच्या ट्विवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये महिलांसाठी काही महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे

​केवळ २० वर्षांची मुलगी अशा गुन्ह्यात सामील असू शकते, यावरून हे स्पष्ट होते की गुन्हेगार आता कोणत्याही रूपात असू शकतात. त्यामुळे प्रवास करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • ​१.दागिने झाकून ठेवा: गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासात सोन्याचे दागिने, विशेषतः मंगळसूत्र किंवा चैन स्कार्फने किंवा पदराने झाकून ठेवा.
  • २. गर्दीत सतर्क राहा: रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा मार्केटमध्ये कोणी संशयास्पद रित्या तुमच्या जवळ येत असेल, तर लगेच सावध व्हा.
  • ३. मोबाईलमध्ये मग्न राहू नका: अनेकदा आपण फोनमध्ये बघत चालतो, ज्याचा फायदा चोरटे घेतात. आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष असू द्या.
  • ४. तातडीने मदत घ्या: जर अशी घटना घडली, तर घाबरून न जाता लगेच आरडाओरडा करा. रेल्वे पोलीस (GRP) किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा.
  • ​समाजाला आवाहन: गुन्हेगारांचे वय पाहून दया दाखवू नका, तर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा. सतर्क राहा, सुरक्षित राहा!