Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अवाक् करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईच्या एका महिलेनी गुलाबी रंगाची बिर्याणी बनवली आहे.तुम्हाला वाटेल गुलाबी रंगाची बिर्याणी कोण खाईल? पण हा व्हिडीओ पाहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तम मिळेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हल्ली अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. कधी मॅगीचे नवीन नवीन प्रकार शोधतात तर कधी पाणी पुरीचे प्रकार शोधतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला बिर्याणीचा हा नवा हटके प्रकार दिसून येईल.

हेही वाचा : Pune : हे फक्त पुण्यातच घडू शकतं! गेट समोर पार्किंग केल्याने काकाने चक्क गाडीच्या चाकातील हवा सोडली हवा सोडली, व्हिडीओ व्हायरल

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका पार्टीतील आहे. या पार्टीची बार्बी थीम देण्यात आली आहे. बार्बी थीमध्ये गुलाबी रंग खूप महत्त्वाचा असतो. व्हिडीओत सुद्धा तुम्हाला जिकडे तिकडे गुलाबी रंग दिसेल. व्हिडीओत एक महिला बार्बी थीमवर आधारीत गुलाबी रंगाची बिर्याणी बनवताना दिसत आहे. या व्हिडीओत ही महिला म्हणते, “बार्बी बिर्याणी छान वाटत आहे ना? गुलाबी रंगाचा मसाला, गुलाबी रंगाचा राइस आणि अजुन बरेच काही गुलाबी खायचे आहे.. आमच्याबरोबर राहा.” पुढे ही महिला बार्बी बिर्याणीचा रायता बनवताना दिसत आहे. हा रायता सुद्धा गुलाबी रंगाचा आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

creamycreationsbyhkr या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओतील महिलेचे नाव हिना कसूर राद असून तिचे मुंबईत एचकेआर बेकिंग अॅकेडमी (HKR baking Academy) आहे. ती तिच्या इ्न्स्टाग्राम अकाउंटवर खाद्यपदार्थाबाबत नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. या गुलाबी बिर्याणीच्या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही यात खूप रंग टाकला आहे. हे आरोग्यासाठी चांगले नाही” तर एका युजरने लिहिलेय, “मला हे अजिबात आवडले नाही. काही युजर्सनी या बिर्याणीवरुन ट्रोल केले आहे तर काही लोकांना ही थीम हटके वाटली.