Mumbai Girl Quits 75 Lakh Rs Job In US: दक्षिण मुंबईतील २५ वर्षीय मार्केटिंग प्रोफेशनल तरुणी अनहदचा, ती दरमहा २.६७ लाख रुपये कमवते,असे सांगणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. याचबरोबर, या व्हिडिओमध्ये तिने इतक्या कमी वयात आपल्या करिअरमध्ये ती इतकी पुढे कशी गेली, हे देखील स्पष्ट केले आहे.

इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनहदने तिच्या मासिक खर्चाबद्दल तपशील दिला आहे. तसेच, तिच्या ४० लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजचा उल्लेखही केला आहे. काही लोकांनी तिच्या यशाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या दाव्यांवर शंका उपस्थित केली. यामुळेच अनहदने तिच्या पगाराबाबत स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला. यात विनापगार इंटर्नशिपपासून ते भारतातील उच्च पगाराच्या रिमोट नोकरीपर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे.

२०२४ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर, अनहद तिच्या स्वप्नातील नोकरीच्या शोधात अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात गेली. तिथे पोहोचताच, तिने एका भारतीय किराणा दुकानात विनापगार इंटर्नशिप केली, जिथे ती ब्रँडिंगचं काम करत असे.

अखेर तिला एका मार्केटिंग एजन्सीमध्ये चांगली नोकरी मिळाली. मात्र, ती आदर्श नोकरी नव्हती. तिला फक्त २० डॉलर्स प्रति तास पगार मिळत होता, जो न्यू यॉर्कसारख्या महागड्या शहरात जगण्यासाठी अपुरा होता. काही महिन्यांनंतर तिला अखेर ६०,००० डॉलर्स (सुमारे ५१ लाख रुपये) वार्षिक पगाराची पूर्णवेळ नोकरी मिळाली. ही नोकरी मिळाल्यानंतरही, “मी अजूनही अडचणीत होते,” असं अनहदने या व्हिडिओत म्हटलं आहे.

एप्रिल २०२४ मध्ये, तिला वार्षिक ७५,००० डॉलर्स (सुमारे ६४ लाख रुपये) पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र, जास्त पगार असूनही, व्हिसासंबंधी अडचणी आणि मानसिक तणावामुळे तिला ही नोकरी नाकारून भारतात परतावं लागलं. तिच्या कंपनीने तिला वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आणि तिचा पगार भारताच्या राहणीमानाशी सुसंगत केला. ऑक्टोबर २०२४ पासून ती वार्षिक ४० लाख रुपये कमवत आहे, जे कर वगळता दरमहा २.६७ लाख रुपये होतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनहदने कबूल केलं की तिचा व्यवसाय ग्लॅमरस नाही. ती दक्षिण मुंबईत तिच्या पालकांसोबत राहते, त्यामुळे तिला भाडं, किराणा किंवा युटिलिटी बिल भरावं लागत नाही. तिच्या पगाराच्या अर्ध्याहून अधिक रक्कम एसआयपीमध्ये जाते आणि उर्वरित रक्कम जेवण, स्वतःचे खर्च आणि “गूढ निधी”मध्ये खर्च केली जाते.