Mumbai Rains jogeshwari meghwadi: मुंबईमध्ये सोमवारी म्हणजेच १३ मे रोजी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली होती. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळालं. सोबतच अवकाळी पावसाचंही आगमन झालं होतं. याच दरम्यान मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर मुंबईच्या घाटकोपर भागात भीषण दुर्घटना झाली तर वडाळ्यातही टॉवर कोसळला. दरम्यान सोमवारी आलेल्या वादळात जोगेश्वरी येथील मेघवाडीतही एक दुर्घटना घडली. याचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

जोगेश्वरीतील मेघवाडीत नेमकं काय घडलं

a guy returned after 2 and half year from london and enter at home as a unknown person
Video : अचानक अनोळखी व्यक्ती घरात शिरली अन् घरच्यांनी ओळखलेच नाही, मायदेशी परतलेल्या मुलाने दिले भन्नाट सरप्राइज
vat purnima 2024 vatpurnima special ukhane list in marathi vat savitri 2024
Vat Purnima 2024 : ‘देव बनवतो साताजन्माची गाठ…’ वटपौर्णिमेनिमित्त तुमच्या अहोंसाठी खास उखाणे, पाहा लिस्ट
Junagadh Lion Viral Video
‘शिकार करो या शिकार बनो’ गायीचा जीव वाचवण्यासाठी बैलाने केला दोन सिंहांचा मोठा गेम, तुफान लढतीचा व्हिडीओ व्हायरल
a groom said funny ukhana for his wife
“जिम करणारी बायको मिळाली, डाएटचं आता टेन्शन मिटलं..” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ एकदा पाहाच
In a movie theatre person filming several audience resting their feet on the front seats in a PVR multiplex watch ones viral video
सीट्सवर पाय अन् मोबाईल बॅटरी ऑन…; थिएटरमध्ये प्रेक्षकांनी असे काही केले की, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले…
Kiley Paul's amazing dance on the song Bado Badi
‘बदो बदी’ गाण्यावर किली पॉलचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “या गाण्याची कमी…”
mother daughter bond
VIDEO : “आई आहे म्हणून माहेर आहे” व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील आईबरोबरचे सुंदर क्षण
kanpur viral video head constable dies heat stroke inspector films instead of helping dies
माणुसकी मेली! हेड कॉन्स्टेबल उष्माघाताने पडला बेशुद्ध: पण सब-इन्स्पेक्टर बनवत राहिला Video; कालांतराने झाला मृत्यू
How To Use Umbrella While Wearing Saree
साडी नेसल्यावर छत्री कशी पकडायची? २५ लाख लोकांनी पाहिलेल्या VIDEO मध्ये आहे तरी काय? पाहून पोट धरुन हसाल

चार दिवसांपूर्वी मुंबईत धुळीचे मोठे वादळ आले होते. वादळ काही वेळातच थांबले तरी या वादळाची चर्चा मात्र, अद्याप थांबलेली नाही. दरम्यान सोमवरी जोगेश्वरीतील मेगाडीतही या वादळाचा फटका बसलेला पाहायला मिळाला. ही घटना सोमवारी ५ वाजताच्या सुमारास जोगेश्वरी येथील मेघवाडी परिसरातील नाक्यावर घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेघवाडी रिक्षा स्टँडचा परिसर दिसत आहे, पाऊस आणि वाऱ्यामुळे येणारे जाणारे लोक दुकानाच्या छपराखाली उभे आहेत. तर रिक्षाचालकही रिक्षा थांबवून उभे आहेत. याचवेळी अचानक एक नारळाचं मोठं झाड रिक्षावर पडतं आणि रिक्षाबरोबर रिक्षाचालकही त्याखाली दबला जातो. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे.

अवघ्या ३ सेंकदाचा फरक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, थांबलेला रिक्षा चालक रिक्षा सुरुच करत असतो आणि हे झाडं कोसळतं. अवघ्या ३ सेंकदाच्या फरकानं रिक्षाचालक झाडाखील दबल्याचं दिसत आहे. झाड कोसळताच आजूबाजूला असलेले लोक घाबरतात आणि तिथून पळ काढतात. आपण बऱ्याच वेळी ऐकलं असेल की पाऊस वारा असताना कोणत्याही आडोशाला उभं राहण्याआधी ते ठिकाण सुरक्षित आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. हा व्हिडीओ mumbai_tv नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?

मुंबईला वादळाचा मोठा तडाखा

१३ मे रोजी मुंबईत वादळ आले होते. या वादळामुळे मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ६७ लोक जखमी झाले आहेत. वादळासह पाऊस आल्याने १०० पेक्षा अधिक लोक या होर्डिंगकाळी थांबले होते. यावेळी हे होर्डिंग कोसळले.तर, दुसरीकडे वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळले. यामध्ये १२ ते १३ कारचं नुकसान झाले.