Mumbai Local Train Ladies Fights video: मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.

सध्या असाच एक मंबई लोकलमधला भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये महिलांची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

महिला डब्यात सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट जोरदार मारहाणीत झालं. एकमेकींना शिवीगाळ करत, केस ओढत आणि चापटा-बुक्क्यांचा वर्षाव करत महिलांनी परस्परांवर जबरदस्त हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांमध्ये तुंबळ हाणामारी मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. एकमेकांचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. संबंधित महिलांमध्ये जागा मिळवण्यावरून वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. काही प्रवाशांनी मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असावा, असंही म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एकानं म्हंटलंय, हे नेहमीचंच आहे तर आणखी एका एका युजरने महिलांच्या हिंसक हाणामारीवर प्रतिक्रिया देत “बापरे जीव जाईल तिचा” अशी प्रतिक्रिया दिलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.