Shocking video: मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल आता जीवघेणी ठरत असल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात मयंक लोहार या २२ वर्षीय तरूणावर चाकूने हल्ला करण्यात आला होता.पावसाचं पाणी आत येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून हा वाद झाला. या वादात आरोपीने एका तरूणावर चाकू हल्ला केला. अंधेरी ते बोरिवली जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. मयंक लोहार असं मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान यानंतर ट्रेनमधला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यामध्ये एका तरुणाला अक्षरश: चालत्या ट्रेनमधून ठकलण्यात आलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो. आतापर्यंत तुम्ही लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक लोकलमधील दोन पुरुषांमधील भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला भांडणामध्ये थेट ट्रेनमधून खाली ढकललं आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

नेमकं काय घडलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक काका एका तरुणाला अमानुष मारहाण करत आहेत. यावेळी तिथे उपस्थित प्रवासी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते कुणाचंही ऐकत नसून तरुणाला मारहाण करत आहेत. तसेच यावेळी हा तरुण त्यांची माफीही मागताना दिसत आहे. मात्र तरीही ते वारंवार त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी स्टेशन येताच लाथा मारून त्यांनी तरुणाला ट्रेनमधून ढकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशाप्रकारे शुल्लक वादानंतर एखाद्याच्या जीवावर उठण्याचे प्रकार सध्या मुंबई लोकलमध्ये वाढत आहेत.

पाहा व्हिडीओ

गेल्या ६ महिन्यात लोकलमध्ये दुसरी हत्या

दरम्यान, या घटनेमुळे २४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मालाड येथील हत्येची आठवण ताजी झाली आहे. मालाड येथे आरोपीने सहप्रवाशाची हत्या केली होती. या प्रकरणी काही तासांत रेल्वे पोलिसांनी आरोपी ओंकार शिंदेला अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या धावत्या रेल्वेमध्ये हत्येची घटना घडली आहे.