Mumbai Local old video viral: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र ही गर्दी गेले अनेक वर्षापासून असल्याचे दिसत आहे. २५ वर्षापूर्वीचा मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोतून स्पष्ट दिसत आहे की, आज मुंबई लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रकारे गर्दी आहे तशीच गर्दी २५ वर्षापूर्वीही होती. यामध्ये मुंबईकर कशाप्रकारे लोकल ट्रेनला लटकून प्रवास करायचे ते दिसत आहे. नेहमीप्रमाणे खचाखच भरलेली लोकल ट्रेन २५ वर्षापूर्वीही याच अवस्थेत होती हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत.आतापर्यंत मुंबईकरांनी अनेक मुंबईचे जुने फोटो पाहिले आहेत. मात्र मुंबई लोकलचा गर्दीचा व्हिडीओ कधी पाहिला नसावा. गर्दीने खचाखच भरलेल्या या ट्रेनमध्ये शिरण्यासाठी जागा नसल्याने अनेकजण या ट्रेनच्या डब्याच्या दारात चढून उभे असल्याचं दिसत आहेत.

तुम्ही जर खरंच मुंबईकर असाल आणि रोज लोकलने प्रवास करता तर हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला लोकल ट्रेनच्या गर्दीची आठवण होईल. मुंबई लोकलमध्येही अशीच गर्दी असते जागा कमी असते, मात्र बोहोत जगाह है अंदर चलो अंदर म्हणत मुंबईकर एकमेकांना अॅडजस्ट करुन घेतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना ‘आपला नम्र, एक पुणेकर’ म्हणत जबरदस्त टोला; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ old_mumbai_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईकर यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, “आम्ही आजूनही करतो हा प्रवास”, तर दुसरा म्हणतो, “मराठी माणसांची मुंबई, जय महाराष्ट्र भावा तुला”