Drunk Man Ignore Loco Pilot Horn Viral Video : मुंबई लोकलचा दररोजचा प्रवास तुम्हाला संयम कसा ठेवला पाहिजे याबद्दल नवनवीन धडे शिकवत असतो. कधी उशीर झाल्यावर ट्रेन लवकर येतात; तर वेळेत निघाल्यावर ट्रेन उशीर येतात. यामुळे वेळेत ऑफिसला पोहचण्यासाठी नेमकं कोणत्या वेळी घरातून बाहेर पडावं हा प्रश्न आजही अनेकांसमोर कायम उभा राहतो. अशातच प्रवासादरम्यान थोडा जरी उशीर झाला, तरी ऑफिसमध्ये उशिरा पोहोचल्याचं कारण बॉसला द्यावंच लागतं. दरम्यान, मुंबई लोकलमधील अशीच काहीशी परिस्थिती दाखवणारा आणि ऑफिसला उशीर का होतो हे मजेशीर पद्धतीने सांगणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अक्षरशः हसू आवरणार नाही, एवढं मात्र नक्की…
रेल्वे रुळावरून ट्रेन जात असते. पण, पटरीच्या अगदी मधोमध एक मद्यधुंद माणूस अगदी स्वतःच्या धुंदीत चालत असतो. लोको पायलट एवढ्या जोरात हॉर्न मारत असतो. पण, तो हॉर्नचा आवाज ऐकून पटरीतून बाजूला जाणं सोडाच तो मागे वळून सुद्धा बघत नाही. फक्त स्वतःच्या धुंदीत चालत असतो. जसा तो माणूस पटरीवरून चालत होता, अगदी त्याच गतीने लोको पायलट ट्रेन पुढे नेत होता; जेणेकरून कोणताही मोठा अपघात घडू नये. मात्र, त्या माणसाला स्वतःच्या जीवाची काहीच पर्वा नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
“जग तुमच्यासमोर झुकतं, फक्त तुमच्यात ताकद असली पाहिजे” (Viral Video)
कमेंटमध्ये अनेक युजर्सनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देत सांगितले की, ही ट्रेन ६ वाजून ४३ मिनिटांची होती, जो बोरिवलीची होती. पण, यादरम्यान हा सगळा प्रकार घडला. बराच वेळ लोको हॉर्नचा आवाज ऐकू आल्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनच्या दरवाजातून डोकावून बाहेर बघून लागले तर काही जण या मजेशीर प्रसंगाचा व्हिडीओ शूट करू लागले. त्यानंतर या प्रवाशाला मारून बाजूला करण्यात आले. लोको पायलट आणि मद्यधुंद प्रवाशाचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr.dipesh_13 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून युजर्स “मला ऑफिसला यायला उशिरा का झाला. हे माझ्या बॉसला मी कसं समजावून सांगू”, “व्हिडीओ काढणाऱ्याचा हात खूपच मोठा आहे वाटतं”, “तो म्हणतं असेल माझ्या मागे मागे यायचं”, “डेंजर माणूस आहे रे भाऊ”, “एक्स्प्रेस असती तर…”, “जग तुमच्यासमोर झुकतं, फक्त तुमच्यात ताकद असली पाहिजे (झुकती हैं दुनिया सिर्फ झुकानेवाला चाहिए” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
