scorecardresearch

मुंबई लोकलमधील ‘या’ व्यक्तीचं का होतंय कौतुक; पाहा Viral Video

Mumbai Local Train Video: हा व्हिडिओ पोस्ट करत युजरने या व्यक्तीचे भरभरून कौतुक केले आहे. तसंच लिहिले की, ‘देशाचा खरा नागरिक आणि एक जबाबदार प्रवासी.’

mumbai ;ocal train video
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्नॅक्सचे पॅकेट खाल्ल्यानंतर टाकून द्यायचे पॅकेट बॅगेत ठेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक त्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी तो पॅकेटमधून स्नॅक्स खातो आणि टाकून द्यायचे पाकीट नीट बॅगेत ठेवतो. यावेळी त्याला कोणी आपला व्हिडिओ बनवत आहे हेही माहीत नसते. हा व्हिडिओ धर्मेश बराई नावाच्या युजरने शेअर केला आहे. यासोबतच यूजरने त्या व्यक्तीचे जोरदार कौतुकही केले आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘देशाचा खरा नागरिक आणि एक जबाबदार प्रवासी. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच लोक या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर लोक आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील देत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: भारतात ‘या’ ठिकाणी कांदा- बटाट्याच्या भावात मिळतात ‘काजू’; शहराचे नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर अनेकजण आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘माझी इच्छा आहे की प्रत्येकजण या व्यक्तीसारखा असावा.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आपल्या सर्वांना त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘खरंच खूप छान काम.’हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि तो झपाट्याने शेअरही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 19:18 IST
ताज्या बातम्या