Mumbai local viral video: मुंबई लोकल म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तर गर्दी, धक्काबुक्की, गरमीनं हैराण झालेले प्रवासी आणि सीट मिळवण्यासाठी सुरू असलेली हाणामारी. अर्थात या गोष्टी मुंबई लोकलमध्ये दररोज घडतात. पण लक्षवेधी बाब म्हणजे हे प्रवासी कितीही भांडले तरी दुसऱ्या दिवशी आपली भांडणं मिटवून पुन्हा एकदा नव्यानं ते मैत्री करतात. मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात.

सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं गाण्यावर थिरकायला लागाल.

त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी… या गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो तो विमान गो हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण ४ तरुणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. चालत्या लोकलमध्ये या तरुणी थिरकताना तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. ‘त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी…’ या मराठी गाण्यावर त्या डान्स करत आहेत. या ठिकाणी लोकल रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या तरुणींनी पुरेपूर उपयोग करून घेतला.

पाहा व्हिडीओ

तरुणींच्या डान्सचा व्हिडिओ archu_gavali844 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.सध्या हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलेला आहे आणि हजारो लाईक्सही मिळालेले आहे शिवाय हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरलेला आहे.खरं तर तरुणींनी लोकल रिकामी असल्याने त्यांनी त्या जागेचा डान्ससाठी पुरेपुर वापर करुन घेतलेला आहे.