Mumbai local viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं दिलात झापुक झुपूक या गाण्यावर थिरकायला लागाल. दिलात झापुक झुपूक गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिलात झापुक झुपूक वाजत राहतंय ग हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा. 'दिलात झापुक झुपूक वाजत राहतय गं' या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण सात तरुणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. चालत्या लोकलमध्ये या तरुणी थिरकताना तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. 'दिलात झापुक झुपूक वाजत राहतय गं' या मराठी गाण्यावर त्या डान्स करत आहेत. या ठिकाणी लोकल रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या तरुणींनी पुरेपूर उपयोग करून घेतला. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: लेक पोलीस झाला अन् वडिल कृतज्ञ; लेकाच्या शिक्षकांसमोर वडिलांनी केलेली कृती पाहून डोळ्यांत येईल पाणी हा व्हिडीओ सोशल मीडियावर _pluviophilic नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या तरुणींचं कौतुक करत व्हिडीओ शेयर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय धावत्या रेल्वेत सर्वांसमोर डान्स करायला धाडस लागतं, असं म्हणत अनेकांनी डान्सला दाद दिली आहे. सोशल मीडियाने अनेकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करून काही प्रसिद्ध झाले तर काही प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहेत. सोशल मीडियामुळे काही लोक सातासमुद्रापारदेखील प्रसिद्ध झाले आहेत.