Mumbai local dance video: मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, मात्र आता महिलांच्या डब्यातून समोर आलेला व्हिडीओ हा अगदी याच्या उलट आहे. रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुणींनी लोकलमध्ये भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांच्यासारखं गाण्यावर थिरकायला लागाल.
तरुणींचा भन्नाट डान्स
सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न या तरुणींनी केला. वाटाण्याचा गोल दाणा गाण्यावर तरुणींनी केलेला हा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाटाण्याचा गोल दाणा पोरी उडू नको टणाटणा पोरी… हे गाणं सध्या प्रचंड चर्चेत आहे. अगदी सोशल मीडियावरील रील्सपासून सर्वत्र या मराठी गाण्याची हवा पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकूण सात तरुणी या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. प्रत्येकीने ड्रेस घातले असून चालत्या लोकलमध्ये या तरुणी थिरकताना दिसत आहेत. यावेळी या तरुणी जराही तोल न जाऊ देता परफेक्ट डान्स करताना पाहून सर्वच जण या तरुणींचं कौतुक करत आहेत. ‘वाटाण्याचा गोल दाणा पोरी उडू नको टणाटणा ’ या मराठी गाण्यावर त्या डान्स करत आहेत. या ठिकाणी लोकल रिकामी असल्यानं त्यांना मोकळी जागा मिळाली आणि याचा या तरुणींनी पुरेपूर उपयोग करून घेतला. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ या तरुणींचा व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “आजोबा जोमात महामंडळ कोमात” सीट पकडण्यासाठी काय केलं पाहा; खिडकी नाही तुटली तर काय झालं पाहा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर _pluviophilic नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या तरुणींचं कौतुक करत व्हिडीओ शेयर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय धावत्या रेल्वेत सर्वांसमोर डान्स करायला धाडस लागतं, असं म्हणत अनेकांनी डान्सला दाद दिली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd