Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये कधी भांडणंही होतात, पण इथे लोक एकमेकांना मनापासून मदतही करतात. एखादी व्यक्ती पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत असेल, तर त्याला योग्य स्टेशनवर उतरायला मदत केली जाते. कोणाला स्टेशन कधी येणार हे माहिती नसेल, तर त्याच्यासाठी जागं राहून, नीट उतरला आहे ना हेही पाहिलं जातं. इतकंच नाही, तर गरोदर महिला किंवा वृद्ध स्त्रियांना बसायला जागा देण्यासाठी मुंबईकर नेहमी पुढे येतात. म्हणूनच मुंबईकर मोठ्या मनाचे आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत मानले जातात.
आज मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका परदेशी प्रवाशाला देखील मुंबईकरांनी खुश केलं आहे. सध्या भारतात राहणाऱ्या परदेशी प्रवाशाने एक सामान्य प्रवास चक्क डान्स फ्लोअरमध्ये रूपांतरित केला. “तुम्ही मला तुमचा आवडती डान्स स्टेप्स शिकवू शकता का” असं त्याने प्रत्येक मुंबईकरांना विचारले. परदेशी प्रवासी एड गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये हातात एक छोटा ब्लूटूथ स्पीकर घेऊन उभा आहे. एकटाच नाचण्याऐवजी, तो ट्रेनच्या डब्यात आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांकडे गेला आणि त्यांच्यासमोर काही डान्स स्टेप्स सादर करू लागला.
मुंबईकरांचा ताण क्षणात केला दूर (Viral Video)
सुरुवातीला लोकलमधील अनेक प्रवासी या अनपेक्षित प्रकारामुळे थोडे आश्चर्यचकित झाले. रोजच्या प्रवासाच्या गर्दीत अचानक घडणारा हा परफॉर्मन्स पाहून काही जण कुतूहलाने पाहत होते. तर अनेक जणांना नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी हे सुरुवातीला समजत नव्हते. एडने हसत-हसत इतर प्रवाशांना हाताने इशारा करून त्यांनाही नाचात सहभागी होण्यास सांगितले आणि त्यांचे डान्स मूव्ह्स दाखवण्यास प्रोत्साहित केले. मग हळूहळू एकामागोमाग एक प्रवासी उठून नाचू लागले, काहीजण आपल्या जागेवरून टाळ्या वाजवत, हसत प्रोत्साहन देत होते.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रवाशांनी अचानक सुरू झालेल्या या डान्समध्ये सहभागी झाल्याचे छोटे-छोटे क्षण दिसतात. काही जण एडचे स्टेप्स कॉपी करत होते, तर काहींनी आत्मविश्वासाने आपले वेगळे डान्स मूव्ह्स दाखवत होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ed.people या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून “इथे ठीक आहे विरार लोकलमध्ये म्युझिकची गरजच नाही… अंधेरीनंतर पब्लिक स्वतःच बीट तयार करून नाचायला लागते”, “अरे वा भाऊ, काय जबरदस्त vibe आहे! काही सेकंदांतच लोकांचा सगळा ताण गायब करून टाकलास”, “मुंबईकरांचं मन खरंच सोन्यासारखं असतं” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
