Mumbai Local Video : मुंबई कधीच कोणासाठी थांबत नाही, असं म्हणतात. सकाळी पहिल्या ट्रेनपासून ते अगदी शेवटच्या ट्रेनपर्यंत प्रवाशांचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे दररोज मुंबई लोकलमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. छोट्या-छोट्या गोष्टी विकून पोट भरणारे ते घरातलं आवरून नोकरीसाठी पळणारे तुम्हाला अनेक जण दिसून येतील. हे सगळं असलं तरीही ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी प्रत्येक मुंबईकराला कसरत ही करावीच लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्तीने उतरता ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाला कोपर मारले आणि मग नंतर इतर प्रवाशांचा धक्का लागून तो स्वतःच खाली पडला.

व्हायरल व्हिडीओ मुंबईतील रेल्वेस्थानकाचा आहे. रेल्वेस्थानकावर ट्रेन थांबली आहे आणि प्रवासी ट्रेनमध्ये चढताना दिसत आहे. पण, ट्रेनच्या दरवाजावर विनाकारण उभे राहणारे प्रवासी दादागिरी करण्यास सुरुवात करतात. रेल्वेस्थानकावर उभे असणारे प्रवासी चढतात आणि ट्रेनमधले प्रवासी एकाच वेळी उतरतात. मग एकच गोंधळ उडतो. ट्रेनच्या दरवाजाच्या मध्ये असणाऱ्या खांबाच्या दोन्ही बाजूंनी प्रवासी चढण्यास सुरुवात करतात आणि एक व्यक्ती या प्रवाशांमध्ये अडकून पडते. नक्की काय घडलं ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…मस्ती नव्हे दोस्ती…! मालकाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला; स्विमिंग पूलमध्ये श्वानाने घेतली उडी अन्… पाहा हृदयस्पर्शी VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

दरवाजात उभ्या प्रवाशांची दादागिरी :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की… व्हिडीओमध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबलेली दिसते आहे. मुंबई लोकलमधून एक व्यक्ती ट्रेनमधून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. तो माणूस उतरता-उतरता ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशाला कोपर मारतो. तो कोपर मारतोय हे पाहून चढणाऱ्या प्रवाशाने त्याला धक्का दिला. अक्षरशः त्याला रेल्वेस्थानकावर ढकलून दिले आहे आणि तो खाली पडलेला दिसत आहे. खाली पडल्यामुळे त्याचे कपडेदेखील अस्वच्छ झालेले दिसून येत आहेत. हे दृश्य प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या गंभीर अडचणींचा पर्दाफाश करतो आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी मुंबईतील प्रवाशांना भेडसावणाऱ्या रोजच्या आव्हानांवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रवासी फक्त लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी एकमेकांना मारतात, शिवीगाळ करतात, इतरांना न बघता ढकलतात आणि हे फक्त भारतमध्येच घडते. हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, अनेक दशकांपासून मुंबईतील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रदान करण्यात अधिकारी असमर्थ ठरले आहेत; जे खूप लाजिरवाणे आहे. बघायला गेलं, तर मुंबईत हे अनेक वर्षांपासून घडतं आहे. कदाचित मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अशा घटना घडल्याशिवाय एकही दिवस जात नाही आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.