Mumbai Local Viral Video : गरीब असो वा श्रीमंत या जगात आला असाल तर तुमच्या आयुष्यात संघर्ष हा येणार. आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात. कधी घर चालवण्यासाठी बाहेर पडावं लागतं, तर कधी घरी राहूनच छोटी-मोठी काम करून घर चालवावं लागतं. अनेकदा प्रवास दरम्यान आपल्याला अनेक असे छोटे व्यावसायिक दिसतात; जे घर चालवण्यासाठी किंवा अगदी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, ४ पैसे कमवण्यासाठी धडपडत असतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
मुंबई लोकलमध्ये एक काका अगदी छोट्या-छोट्या वस्तू विकताना दिसत आहेत. कोणतीही बॅग किंवा अगदी डब्यातून किंवा खोक्यातून नव्हे त्यांनी स्वतःच्या कपड्यावर म्हणजेच शर्टावर वस्तू लावल्या आहेत. पेन, पेन्सिल, किचेन, पर्ससह अगदी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी अगदी बारीक सारीक व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत आणि मुंबई लोकलमध्ये या वस्तू निघण्यासाठी निघाले आहेत. नकळत एका प्रवाशाने या छोट्या, मेहनती व्यापाराला पाहिले आणि मग व्हिडीओ शूट करून घेतला.
ट्रेनचा प्रवास खूप काही शिकवतो (Viral Video)
चेहऱ्यावर कोणताही थकवा किंवा कंटाळा नाही. तसेच या व्यापाऱ्याचं पैसे कमवण्याची धडपड पाहून कोणालाही कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. आपण काहीच करू शकत नाही असं सतत म्हणण्यापेक्षा एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हाच प्रयत्न करताना आज मुंबई लोकलमधील हे काका दिसले. पैसे कमवायला किंवा वस्तू विकायला फक्त दुकानाची, स्टॉलची गरज असते असे नाही. तर फक्त तुमची जिद्द आणि मनाची तयारी असावी लागते. एकदा बघाच व्हायरल होणारा हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @probindebnathh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “ट्रेनने प्रवास मला खूप काही शिकवतो. मी जगतोय ते आयुष्यही कुणाचंतरी स्वप्न असू शकतं. म्हणूनच परिस्थिती कशीही असली तरी तक्रार न करता कृतज्ञ राहायला हवं”, “सर्व वडिलांचा आदर करा. एक बाप आपल्या कुटुंबासाठी नेहमी मेहनत करत असतो” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
