Mumbai Local Passenger Sing A Song Viral Video : मुंबई लोकलमध्ये भजन ऐकून कधी मंदिरात आल्यासारखं तृप्त वाटतं, कधी रेल्वे डब्यात कुस्तीचा आखाडा पाहायला मिळतो, तर कधी कधी प्रवासात छोट्या व्यापाऱ्यांमुळे विंडो शॉपिंगसुद्धा होऊन जाते. अशी मुंबई लोकलची अनोखी रूपं प्रवासादरम्यान आपल्याला बघायला मिळतात. आपण नेहमीच सकाळी पुरुषांच्या डब्यात भजन गाताना, टाळ-वाद्ये वाजवताना अनेक पुरुष मंडळींना पाहिलं असेल. पण, जेव्हा संध्याकाळी लोक कामावरून थकून घरी जायला निघतात तेव्हा मात्र ही मंडळी काय करतात हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई लोकलच्या डब्यात प्रचंड गर्दी दिसते आहे. तरीही संध्याकाळी घरी जाताना कामाचा ताण हलका करण्यासाठी सगळ्या पुरुष मंडळीनी मिळून जणू काही जबरदस्त कॉन्सर्टचे आयोजन केले आहे, असं दृश्य दिसत आहे. झील के उस पार या जुन्या चित्रपटातील ‘दो घूँट मुझे भी पिला दे शराबी’ गाणं सगळे मिळून गाताना आणि वाजवताना दिसत आहेत. काही जण या कॉन्सर्टचा फक्त बघून आनंद घेत आहेत; तर अनेक जात त्यात नकळत सहभागी होऊन टाळ्या वाजवीत इतरांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

“हीच लोकल ट्रेनमध्ये मजा आहे” (Viral Video )

कामाचा ताण, कुटुंबांचे टेन्शन, घरी वेळेत पोहोचण्याची घाई, बसायला न मिळाल्याचे दुःख अशी अनेक विचार संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात सुरू असतात. तर हे विचार काही क्षणांसाठी का होईना दूर करण्यासाठी आणि प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई लोकलमध्येच प्रवाशांनी मिळून खास कॉन्सर्टचे आयोजन केले आहे, ज्याचा आनंद अनेक मंडळी घेताना दिसत आहेत. तर, काही जण संध्याकाळी कामावरून थकून आल्यावर एवढी ऊर्जा येतेच कुठून याबद्दल विचार करताना दिसत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @30sai20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मुंबई लोकलची संध्याकाळ’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “यापेक्षा हरी भजन खूप छान”, “हीच लोकल ट्रेनमध्ये मजा आहे”, “मी खूप वेळा ह्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मग एकदा संधी मिळाली आणि खूप भारी वाटल. एन्जॉयमेंट काय असते ते कळलं”, “मस्त” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.