scorecardresearch

Premium

काकू भडकल्या ना राव! तरुणीच्या थेट कानशिलात लगावली, मुंबई लोकलमधला व्हिडीओ व्हायरल

जाणून घ्या नेमकी काय घडली ही घटना?

Viral Video
मुंबई लोकलमधला व्हिडीओ व्हायरल (फोटो-ANI)

मुंबई लोकलचा डब्यात महिलांची एकमेकांशी होणारी मारामारी, शिवीगाळ यांचे व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला दुसऱ्या महिलेच्या कानशिलात लगावताना दिसते आहे. दोन बायकांच्या भांडणाने हा डबाच दणाणून गेल्याचं दिसून येतं आहे.

लोकलमधल्या काकूंनी तरुणीच्या लगावली कानशिलात

या व्हायरल व्हिडीओत एक काकू एका तरुणीशी वाद घालताना अचानक तिला कानशिलात लगावताना दिसत आहेत. या दोघींमधला वाद कशावरुन झाला ते लक्षात येत नाही. मात्र काकू या तरुणीच्या जोरदार कानशिलात लगावतात आणि मग ही तरुणी खाली बसते असं या व्हिडीओत दिसून येतं आहे. काकू या मुलीला सुनावतच राहतात. त्यानंतर मुलीनेही या काकूंना उत्तर देण्यास सुरुवात केली. या दोघींची बाचाबाची इतर महिला पाहात आहेत असं या व्हिडीओत दिसतं आहे. हा व्हिडीओ २५ सप्टेंबरचा आहे असं दिसतं आहे. मुंबई Matters ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

chandrapur boy commits suicide, chandrapur video game parlours, chandrapur suicide case, chandrapur video game player commits suicide
व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या
music performance on song Deva Shree Ganesha by Mumbai Police Band
Mumbai Police Video : मुंबई पोलिसांकडून बाप्पाला देण्यात आली अनोखी मानवंदना, सूरमयी सादरीकरणाचा व्हिडीओ एकदा पाहाच…
Female Patient Dance On SRK Song Video
Viral Video: तरुणीला रुग्णालयातच चढला शाहरुख खानच्या गाण्याचा फिव्हर, बेडवरून उठली अन् भन्नाट नाचू लागली
Little Girls dance on pahun jevla kay
”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल

तर दुसऱ्या एका व्हिडीओत एक महिला दुसऱ्या महिलेला फोर्थ सीटवरुन शिव्या देताना दिसते आहे. या दोघींचं जोरदार भांडण झालं आहे आणि त्यात एक महिला दुसऱ्या महिलेला खडे बोल सुनावत शिव्या देताना दिसते आहे. हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला क्षुल्लक गोष्टींवरुन भांडतात आणि नंतर एकमेकींचे केस ओढू लागतात.या व्हिडीओमध्ये एका खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दोन महिला कोणत्यातरी मुद्द्यावरून एकमेकांशी जोरजोरात भांडू लागतात. बराच वेळ वाद घातल्यानंतर दोघी एकमेकांना हाताने मारु लागतात. यावेळी एक महिला दुसऱ्या महिलेला जोरात कानाखाली वाजवते, त्यानंतर दुसरी महिलाही कानाखाली वाजवण्यासाठी पुढे येते. यानंतर दोघींची मारामारी सुरु होते, दोघीही एकमेकींचे केस ओढू लागतात. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी मध्यस्थी करत दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याकाही थांबण्याचे नाव घेत नव्हत्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai local women slaps other girl in local train video viral scj

First published on: 27-09-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×