Shocking video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अगदी घरातल्या महिलांवरही अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.मुंबई हे शहर कधीच झोपत नाही आणि कदाचीत त्याचमुळे या शहराला सुरक्षित शहर म्हणून पाहिलं जाते. रात्री, मध्यरात्रीही एकटी स्त्री मुंबईत सुरक्षित फिरू शकते असं बऱ्याचदा म्हंटलं जातं. मात्र मुंबईतल्या मलाडमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक आजूबाजूचं भान न राखता, आपली मनमानी करतात. तसेच, हे आंबटशौकीन सार्वजनिक ठिकाणीही अश्लील कृत्य करताना मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना मलाडमधल्या बस स्टॉपवर घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणची सुरक्षितता आणि सामाजिक वर्तन याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दोन तरुणींना एक तरुण मारहाण करताना दिसत आहे. त्यानं मद्यपान केलं असल्याचं स्पष्टपणे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान या तरुणाला तरुणीही प्रतिकार करत त्याला मारताना दिसत आहेत. मात्र तरीही हा तरुण त्यांना मारत आहे, थोड्यावेळानं हा तरुण तिथून घाबरून पळून गेल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DY0XrKMM0-w/?igsh=MWFramVhMTFrNDN2Zw==
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्या घृणास्पद कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एकानं म्हटलंय, “बापरे, अशा माणसांना खूप बेदम चोप दिला पाहिजे.” तर आणखी एकानं, “व्हिडीओ काढण्यापेक्षा त्या तरुणींना मदत करायला हवी होती.” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर आल्या आहेत.
