Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या बाईकच्या सीटच्या खाली बसला आहे. रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. सध्या मुंबईतल्या कार्टर रोडवर एका भरधाव जाणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.
वांद्रे येथील कार्टर रोडवर एका भरधाव जाणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती इलेक्ट्रिक वाहनावर झोपलेला दिसत आहे. तो एकतर गंभीर जखमी झाला आहे किंवा मृतावस्थेत आहे. त्या व्यक्तीच्या स्थितीबद्दल तपशील अद्याप मिळालेले नाहीत, परंतु दृश्यांमुळे शहरातील रस्ता सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
‘बांद्रा बझ’ या एक्स पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. वांद्रे बझने या घटनेचे वर्णन केले आहे आणि लिहिले आहे की, “७ जून रोजी पहाटे १२:२७ च्या सुमारास कार्टर रोडवर चालत्या इलेक्ट्रिक कारच्या बोनेटवर तरुण पडलेला दिसला, ज्यामुळे सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या बेपर्वा वर्तनामुळे वाहतूक नियम कडक करण्याची तातडीची गरज अधोरेखित होते.”पोस्टमध्ये बेपर्वा वाहन चालवण्याचा निषेध करण्यात आला आणि पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेने रस्ता सुरक्षेबाबत चिंता निर्माण केली असून कडक गस्त घालण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ
मुंबई पोलिसांना टॅग करून, पेजने पोलिसांना संबंधित ड्रायव्हरवर कारवाई करण्याची विनंती केली. “आम्ही तुम्हाला विनंती करतो की अशा बेपर्वा वर्तनामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी कारवाई करा आणि त्यावर उपाययोजना करा,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी व्हिडिओला दिलेल्या उत्तरात सांगितले की, त्यांनी आवश्यक कारवाईसाठी खार पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळवली आहे.