डान्सिंग अंकललाही लाजवेल असा ‘डान्सिंग मुंबई पोलीस’; तुफान व्हायरल झालाय हा व्हिडीओ

अमोल कांबळे यांचा हा दबंग डान्स स्टाईल डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. या व्हिडिओला हजारो शेअर्स आणि लाखो लाईक्स आहेत.

mumbai-police-amazing-dance-video-goes-viral-gst-97
भल्या भल्या अभिनेत्यांना आणि डान्सर्सना फिकं पाडेल असा हा डान्स तुम्हालाही पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होईल. (Photo : Amol Kamble/Instagram)

तुम्हाला ‘डान्सिंग अंकल’चा व्हिडीओ माहित असेल ह्यात कोणतीही शंका नाही. पण आता सोशल मीडियावर त्याहूनही भन्नाट असा ‘डान्सिंग मुंबई पोलीस’चा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. भल्या भल्या अभिनेत्यांना आणि डान्सर्सना फिकं पाडेल असा हा डान्स तुम्हालाही पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होईल. सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे. मुंबई पोलिस दलातील अमोल कांबळे यांचा हा डान्स व्हिडीओ आहे. “आया है राजा” हे प्रसिद्ध गाणं आणि अमोल कांबळे यांची दबंग डान्स स्टाईल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. अमोल कांबळे यांच्या या व्हिडिओला हजारो शेअर्स आणि लाखो लाईक्स आहेत.

अमोल कांबळे हे सध्या स्टार पोलीस म्हणून प्रसिद्ध होत आहेत. कारण, सोशल मीडियावर आणि विशेषतः इंस्टाग्रामवर आपल्या या डान्समुळे ते व्हिडीओ स्टार बनले आहेत. खरंतर अगदी सुरुवातीला अमोल कांबळे हे आपले डान्स व्हिडीओज टिकटॉकवर बनवायचे. पुढे आपल्याकडे टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्यांनी इन्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून आपले हे डान्स व्हिडिओज शेअर करायला सुरुवात केली.

पाहुयात, स्टार पोलिसाचा तुफान व्हायरल डान्स व्हिडीओ

खरंतर अमोल कांबळे यांनी सुरवातीला इंस्टाग्रामवर आपले जुनेच व्हिडिओज पोस्ट केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांनी आपले नवे व्हिडीओज बनवायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या या व्हिडिओजना इंस्टाग्रामवर चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि ते व्हायरल देखील होऊ लागले. सध्या सगळीकडे व्हायरल होणारा व्हिडीओ हा त्यांच्या अशाच अनेक व्हिडीओज पैकी एक आहे. ते आपल्या सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ काढून हे डान्स व्हिडीओज बनवतात आणि शेअर करतात.

खरंतर आपल्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत रात्रंदिवस सेवेत तत्पर असणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी असा किती मोकळा वेळ मिळत असेल? हा मोठा प्रश्न आहे. आपल्यापैकी सर्वांनाच त्यांच्यावर असलेल्या ताणाची पूर्ण कल्पना आहे. म्हणून जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा त्याला भरभरून दाद मिळाली, खूप कौतुक झालं. कारण, इतर वेळी बाहेरून अत्यंत कडक दिसणाऱ्या आणि प्रचंड तणावातून जाणाऱ्या अशा स्टार पोलिसाला त्याच्या दिलखुलास अंदाजात पाहणं हे सुखावणारंचआहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police amazing dance video goes viral gst

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या