Shocking video : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अगदी घरातल्या महिलांवरही अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.मुंबई हे शहर कधीच झोपत नाही आणि कदाचीत त्याचमुळे या शहराला सुरक्षित शहर म्हणून पाहिलं जाते. रात्री, मध्यरात्रीही एकटी स्त्री मुंबईत सुरक्षित फिरू शकते असं बऱ्याचदा म्हंटलं जातं. मात्र मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह इथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असले की, मरीन ड्राइव्हवर नेमकं काय घडलं? तर यासंदर्भात कॅप्शनमध्ये तरुणीनं माहिती दिली आहे. “मुलींनो.. हा तोच मुलगा आहे जो १ जून २०२६ रोजी सोमवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास मरीन लाइन्समध्ये होता. तो माझ्या शेजारी बसलेल्या मुलींकडे अचानक जाऊन त्यांचा व्हॉट्सॲप नंबर, इन्स्टा आयडी किंवा इतर कोणताही सोशल मीडिया आयडी मागू लागला. जेव्हा मुलीने नकार दिला, तेव्हा तो निघून गेला आणि मग त्या मुलीचे फोटो काढू लागला. आम्ही सर्वजण हे सर्व पाहत होतो, पण ती मुलगी काहीही बोलायला खूप घाबरत होती, अक्षरशः थरथर कापत होती. मग आम्ही तिला मुंबई पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर मुंबई पोलीस आले आणि त्यांनी त्या मुलावर कारवाई केली. त्याला रंगेहाथ पकडले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या फोनमध्ये त्या मुलीचा फोटो होता. म्हणून मुलींनो, जर तुम्ही मरीन लाइन्सला जात असाल, तर कृपया अशा विकृत लोकांपासून दूर राहा आणि तुमचे फोटो कोण काढत आहे याबद्दल जागरूक राहा. मुलींनो, कृपया अपडेटेड राहा.”

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्या घृणास्पद कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एकानं म्हटलंय, “बापरे, अशा माणसांना खूप बेदम चोप दिला पाहिजे.” तर आणखी एकानं, “मुबई पोलिसांचे खरंच कौतुक आहे” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर आल्या आहेत.