scorecardresearch

Premium

Video :विसर्जनादरम्यान बाप-लेकाला सुखरूप घरी पोहचवण्यास मुंबई पोलिसांनी ‘अशी’ केली मदत

विसर्जनादरम्यान घरी जाण्यासाठी टॅक्सी मिळत नसलेल्या कुटुंबाला घरी सुरक्षित पोहोचण्यास मुंबई पोलिसांनी मदत केली.

Mumbai police helped a family who could not get a taxi home during Ganpati Visarjan to reach home safely
(सौजन्य:ट्विटर/@MumbaiPolice)Video: विसर्जनादरम्यान बाप-लेकाला सुखरूप घरी पोहचवण्यास मुंबई पोलिसांनी 'अशी' केली मदत

सध्या गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. तसेच काल पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनसुद्धा करण्यात आले. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते. अशा ठिकाणी धक्काबुक्की, घाई-गर्दी होऊ नये यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.तर आज सोशल मीडियावर या संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. विसर्जनादरम्यान घरी जाण्यासाठी टॅक्सी मिळत नसलेल्या कुटुंबाला घरी सुरक्षित पोहोचण्यास मुंबई पोलिसांनी मदत केली.

व्हायरल व्हिडीओ मुंबई पोलिसांचा आहे. मुंबई पोलिसांचे काही अधिकारी त्यांच्या अधिकृत वाहनामधून कुटुंबाला सुखरूप घरी पोहचवताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांच्या गाडीत पोलिस अधिकारी, बाबा आणि त्यांचा पाच महिन्यांचा मुलगा आहे. विसर्जनादरम्यान बाबा आणि चिमुकला यांना घरी जाण्यासाठी एकही टॅक्सी मिळत न्हवती ; म्हणून मुंबई पोलिसांनी बाबा आणि चिमुकल्याला घरी सोडण्याची जवाबदारी घेतली. बाबांचा चिमुकला अगदी आनंदात पोलिसांच्या अधिकृत गाडीत खेळताना दिसत आहे ; जे पाहून तुमच्या चेहऱ्यावरही नकळत आनंद येईल. मुंबई पोलिसांनी कुटुंबाला घरी पोहचवण्यासाठी कशाप्रकारे स्वतःची जवाबदारी पार पाडली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं…

women helped the male calf that was away from its mother
आईपासून दूर गेलेल्या वासराला तरुणीने केली ‘अशी’ मदत ! Video एकदा पाहाच…
punjab cop suspended after influencer uses police vehicle for insta reel
Video: तरुणीच्या रिल्सची हौस पोलिसांना पडली भारी; पोलिस अधिकाऱ्यावर झाली निलंबनाची कारवाई
Crowd of people to pick up diamonds lying on the street in the market
Video : बाजारात रस्त्यावर पडलेले‌ हिरे उचलण्यासाठी लोकांची गर्दी, सत्य कळताच झाले‌ निराश…
iPhone 15 Pro Kamla Nagar viral video
iPhone 15 च्या डिलिव्हरीला उशीर, ग्राहकाने दुकानदाराला केली गंभीर मारहाण, भांडणादरम्यान कपडे फाडल्याचा VIDEO व्हायरल

हेही वाचा… कहरच केला राव! चक्क खूर्चीवर बसून रिक्षा चालवतोय हा माणूस; VIRAL फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

पोस्ट नक्की बघा :

मुंबई पोलिसांचे मानले आभार :

चिमुकल्याच्या बाबांनी ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करून मुंबई पोलिसांचे आभार मानले आणि लिहिले की, आम्ही चर्नी रोड स्टेशनवर होतो आणि पाऊस पडत होता. गणपती विसर्जनामुळे कोणताही टॅक्सी ड्रायव्हर यायला तयार नव्हता आणि माझा पाच महिन्यांचा मुलगा रडत होता. पण, मुंबई पोलिसांनी @MumbaiPolice आम्हाला आमच्या घरी पोहोचवण्यास मदत केली. असे म्हणत मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आणि जय महाराष्ट्र, जय हिंद असे कॅप्शन लिहिले आणि यासोबत @maikaalaal या अकाउंटवरुन ट्विटरवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

‘मुलांच्या आनंदाचे शब्दात वर्णन करू शकत नाही; असे मुंबई पोलिसांनी कॅप्शन लिहून चिमुकल्याच्या बाबांनी शेअर केलेली पोस्ट मुंबई पोलिसांनी त्यांच्या अकाउंटवरून रिपोस्ट केली आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice अधिकृत अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे , जी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.अनेकजण व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांचे कमेंटमध्ये कौतुक करताना दिसून येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police helped a family who could not get a taxi home during ganpati visarjan to reach home safely asp

First published on: 24-09-2023 at 20:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×