scorecardresearch

पोलिसांनी पकडलं…’तो’ मात्र गिटार वाजवत राहिला; मुंबई पोलिसांचा ‘हा’ व्हिडिओ Viral का होतोय एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याने लोकांची मने जिंकली आहेत..

पोलिसांनी पकडलं…’तो’ मात्र गिटार वाजवत राहिला; मुंबई पोलिसांचा ‘हा’ व्हिडिओ Viral का होतोय एकदा पाहाच
photo: social media

Mumbai Police Video: मुंबईच्या रस्त्यांवर तुम्हाला नेहमी पोलीस फिरताना दिसतील. रात्री अपरात्री हे पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. यांच्यामुळेच मुंबईच्या रस्त्यांवर कोणतीही मोठी दुर्घटना सहसा घडत नाही. खरं तर मुंबईच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी कोणी फिरत असेल तर पोलीस त्यांचा तपास केल्याशिवाय राहत नाहीत. सध्या मुंबई पोलिसांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओत काही तरुण दिसत आहेत. त्यातला एक तरुण गिटार वाजवत आहे आणि पोलीस त्याला गिटार वाजवताना ऐकत आहेत. व्हिडिओ पाहून लोक अंदाज लावत आहेत की, दोन पोलिस बाईकवर बसून पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरुण फिरताना दिसले, त्यावर पोलिसांनी त्यांना थांबवून गिटार वाजवण्यास सांगितले.

रस्त्याच्या कडेला उभे राहून पोलिसांनी गाणे ऐकले..

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका तरुणाने दोन पोलिस अधिकाऱ्यांसमोर ‘केसरिया तेरा इश्क है पिया’ गातानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शिवा नावाच्या कलाकाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण दोन मुंबई पोलिसांच्या समोर गिटार वाजवत गाणे गाताना दिसत आहे. त्याला गाताना पाहून तिथे उपस्थित सर्व लोक मंत्रमुग्ध झाले आहेत. तसच पोलिसांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य दिसत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

( हे ही वाचा: माउंट एवरेस्टच्या टोकावरून असे दिसते ‘जग’; पृथ्वीवरील सर्वात उंचीवरून ३६० डिग्रीचा Video व्हायरल)

व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार, हा परफॉर्मन्स मुंबईतील मरीन ड्राईव्हवर रेकॉर्ड करण्यात आला. परफॉर्मन्सच्या शेवटी बाईकवर बसलेला पोलिस हसताना दिसतो. त्याने या तरुणाच्या गाण्याची स्तुती देखील केली आहे. व्हिडिओ शेअर करताना सिंगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘त्याच्या हास्याने माझे मन जिंकले.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि इन्स्टाग्रामवर सुमारे १.५ लाख लाईक्स आणि १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. पोलिसांसाठी गिटार वाजवणाऱ्या व्यक्तीचे हावभाव पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 18:37 IST

संबंधित बातम्या