Mumbai Ganeshotsav : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव असून, सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावरही गणपती बाप्पांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गणेशोत्सव म्हटलं की, मुंबई आठवते. मुंबईतील गणेशोत्सव पाहायला दूरवरून लोक येतात.
गणपती आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी शहरात जल्लोष पाहायला मिळतो. जागोजागी पोलिस बंदोबस्त असतो. असाच एक मुंबईतील गणपती आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोलिस चक्क ढोल-ताशा वाजवताना दिसत आहे. हा जुना व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, गणपती आगमनाच्या दिवशी रस्त्यावर खूप गर्दी दिसत आहे. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांचे स्वागत केले जात आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त आहे. पुढे व्हिडीओत दिसते की, एक पोलिस अधिकारी आनंदाने तितक्याच जल्लोषात ढोल-ताशा वाजवत आहे. कर्तव्य पार पाडतानाच क्षणभराचा आनंद घेणाऱ्या या पोलिसाचे सर्व जण कौतुक करीत आहेत.
हेही वाचा : Desi Jugaad : पठ्ठ्याने केला अनोखा जुगाड; एस्केलेटर दाबताच करता येईल चक्क टॉयलेट फ्लश
हा व्हायरल व्हिडीओ mumbai7merijaan या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “म्हणून आम्ही म्हणतो, आमची मुंबई!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “असेच अधिकारी आपल्या शहरात, राज्यात आणि देशात पाहिजेत, तेव्हाच आपण आपले सण-उत्सव जल्लोषात साजरे करू शकू…” तर एका युजरने लिहिलेय, “जगातील सर्वांत अप्रतिम दल, मुंबई पोलिस.” काही युजर्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून मुंबईविषयी प्रेमसुद्धा व्यक्त केले आहे.