डिजीटल तंत्रज्ञानामुळे खूप प्रगती झाली आहे पण याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. स्पॅम कॉल, ओटीपी मागून अनेक हॅकर्स आपल्या बँक खात्यामधून पैसे चोरत आहे. त्यामुळे सायबर सिक्युरीटीबाबत सर्वांना माहित असणे गरजेचे आहे. मुंबई पोलिस विविध पद्धतीने वारंवार सायबर सुरक्षेबाबत सर्वांना जागरुक करण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी मुंबई पोलिसांनी हॅरी पॉटरची जादूई मंत्र वापरून सर्वांना सावध केले आहे.

हॅरी पॉटर चित्रपट पाहिला नाही अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. हॅरी पॉटरची लोकप्रियता लक्षात घेऊन मुंबई पोलिस नागरिकांना सायबर सुरक्षेविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करते. यापूर्वी मुंबई पोलिसांनी हॅरी पॉटर चित्रपटातील डायलॉग वापरून नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित कसे राहावे याचा सल्ला दिला होता. यावेळी हॅरी पॉटर जसा शुत्र विरोधात त्याच्या जादू वापरण्यासाठी वेगवेगळे जादूई मंत्र वापरतो त्याप्रमाणे सायबर गुन्हेगारांविरुद्ध जागरुक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी देखील काही कानमंत्र दिले आहेत.

हेही वाचा – “एक वर्ष गेलं वाया”, उशिरा पोहोचल्याने नाकारला प्रवेश; UPSC उमेदवाराची आई झाली बेशुद्ध, वडीलांना कोसळले रडू, Video Viral

एक्सवर मुंबई पोलिसांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये हॅरी पॉटरचे जादूई मंत्र वापरले आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,
“डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी म्हणा ‘कवच सक्रियम्’,
कारण त्यामुळेच होईल ‘संपूर्ण सायबर सुरक्षा’! “

हेही वाचा – धक्कादायक! कॉलेज कॅन्टीनच्या जेवणात सापडले सापाचे तुकडे, विद्यार्थ्यांचा दावा; १०ते १५ जण रुग्णालयात दाखल

तसेच सायबर गुन्हेगारांपासू वाचण्यासाठी काही मंत्र आणि त्याचा अर्थ सांगणारे फोटोही शेअर केले आहे.

अलोहोमोरा – “माझा पासवर्ड सुरक्षा मंत्राने सुरक्षित आहे.”

तुमच्या सिस्टीममध्ये घुसणाऱ्या व्हायरसना अँटीव्हायरल अॅप्लिकेशन डाऊनडोल करून म्हणा, “तत्क्षण मरणासन्”

हॅकर्सनी रुपांतरण काढा घेतला तरी त्याचे खरे रूप ओळखून त्यांना म्हणा, “निपस्त्र भव!”

“पितृदेव संरक्षणम् कारण स्मॅपर्सरुपी डमफिशाच्चांपासून तुमची सुरक्षा होणं महत्त्वाचं!”

व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एकाने म्हटले की,”हॉगवॉर्ट्सकडून तुम्हाला तुमचे पत्र नक्कीच मिळत आहे.”
दुसऱ्याने लिहिले की, “असे दिसते की मुंबई पोलिसांना सर्वात सर्जनशील टीम मिळाली आहे मित्रांनो”
चौथ्यांने लिहिले, “अरे मुंबई पोलिस, एकचं तर हृदय आहे किती वेळा जिंकणार आहात”

एका मुंबईकर व्यक्तीने लिहिले, “आम्हांला अधिक जबाबदार आणि अधिक सुरक्षित मुंबईकर बनवण्याच्या मुंबई पोलिसांनी केलेल्या अप्रतिम सर्जनशील प्रयत्नांसाठी जोरदार टाळ्या!!”