Mumbai hindmata rain video: मुंबईत पावसाचं आगन झाल्यानंतर पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. रविवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. लालबाग परळ, दादर भागातही रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाली असं म्हणायला हरकत नाही कारण दादरच्या हिंदमाता पावसाच्या पाण्यानं अक्षरश: भरलं आहे. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मुंबईत मुसळधार कोसळला

मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. . रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री देखील रिमझिम पावसाच्या सरी बरल्या. दादरमधील हिंदमाता परिसरात पावसामुळे पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे काही गाड्या देखील बंद पडल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गुडघ्याच्या वर पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढणेही कठीण झालं आहे. तसेच वाहनांनाही या पाण्यातून रस्ता काढणे अशक्य झालंय. सखल भाग असल्याने इथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे.

भरलं भरलं “हिंदमाता” भरलं

दादर हिंदमाता परिसरातील हा व्हिडीओ dadarmumbaikar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना “हिंदमाता भरलं म्हणजे पाऊस मोक्कार पडतोय असं गृहीतच धरावे लागते ..” असं कॅप्सन दिलं आहे. मुंबईकर यावर भरभरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> २०२४ मध्ये गणपती बाप्पा कधी येणार? तारीख लक्षात ठेवा; मुंबईत लागले बाप्पाच्या आगमनाचे बोर्ड, VIDEO व्हायरल

ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

मुंबईमध्ये आज, सोमवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे विभागामध्ये दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरातही तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता

नैऋत्य मौसमी वारे तसेच पश्चिमेकडून येणारे वारे अधिक सक्रिय होत असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार, म्हणजे २०४.५ मिमी पावसापेक्षाही अधिक पाऊस पडू शकतो.