Kurla railway station video: मुसळधार पावसामुळे मुंबईत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून लोकल गाड्यांची वाहतूकही नेहमीपेक्षा संथ गतीने सुरू आहे; अशा परिस्थितीत कुर्ला रेल्वे स्थानकावरील एका थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल गाड्या संथ गतीने धावत असतानाच कुर्ला रेल्वे स्थानकावरील एक हृदयस्पर्शी प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे रुळांवर अडकलेल्या भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी एका मोटरमनने काय केलं पाहा..याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुर्ला रेल्वे स्थानकाच्या रुळांवर एक भटका कुत्रा उभा असल्याचे दिसते. त्याचवेळी स्थानकात मुंबई लोकल येत असते. मोटरमनने कुत्र्याला बाजूला करण्यासाठी वारंवार हॉर्न वाजवला, मात्र तो रुळांवरून हलला नाही.यानंतर एका व्यक्तीने धाडस दाखवत रुळांवर उतरून कुत्र्याला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या कुत्र्याने तातडीने प्रतिसाद दिला नाही. व्हायरल व्हिडीओ याच ठिकाणी संपत असल्याने पुढे नेमके काय झाले, याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली. मात्र यावेळी सर्वजण मोटरमनचे कौतुक करत आहेत. त्याने योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे कुत्र्याचा जीव वाचला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने दावा केला की, लोकल पूर्णपणे थांबवून एका नागरिकाने कुत्र्याला रुळांवरून सुरक्षित बाजूला नेले. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. दरम्यान, आणखी एका नेटकऱ्याने कुत्रा अंध, बहिरा किंवा दोन्ही असण्याची शक्यता व्यक्त केली. त्याच्या मते, वारंवार हॉर्न वाजूनही कुत्र्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारपासून अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढली आहे. काही भागांत मागील चोवीस तासांत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारीही हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही प्रदेशांतील पावसाची तीव्रता लक्षात घेऊन ‘रेड’, तर काही भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
