मुंबईतील हॉटेल विकतंय बाहुबली गोल्ड मोमो; वजन दोन किलो, किंमत १२९९

अनेकांच्या आवडत्या मोमोजचा प्रचंड हटके प्रकार मुंबईतील हॉटेल घेऊन आले आहे. हा प्रकार बघून नेटिझन्स स्तब्ध झाले आहेत.

gold moms
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (फोटो: whatafoodiegirl / Instagram )

अनेकांना मोमो खूप आवडतात. गेल्या काही वर्षात हा पदार्थ अचानक ट्रेंडमध्ये आला. रसाळ पदार्थांपासून ते मसालेदार डिपिंग सॉस पर्यंत, मोमोज हे बर्‍याच लोकांसाठी नाश्ता आहे. आता, मुंबईतील एक भोजनालय अनेकांच्या आवडत्या मोमोजची एक प्रचंड हटके प्रकार घेऊन आले आहेत. हा प्रकार बघून नेटिझन्स स्तब्ध झाले आहेत. मुंबईतील मेसी अड्डाचा बाहुबली गोल्ड मोमो २ किलो वजनाचा आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

या प्रचंड मोमोजचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर फूड व्लॉगर दिशा यांनी शेअर केला आहे. क्लिपमध्ये विशेष मोमोविषयी तपशील देण्यात आला आहे. रेकॉर्डिंग सुरू होताच, दिशा एक मोठा वाफेचा वाडगा उघडते आणि सोन्याच्या फॉइलसह सर्वात मोठा मोमो दाखवते. ऑरेंज मिंट मोजीटो सोबत, चॉकलेट मोमोज आणि चटणी आणि सॉसही दिले जातात. संपूर्ण दिशची किंमत १२९९ रुपये आहे.

( हे ही वाचा: Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी)

“हा विशाल मोमो दोन किलोचा आहे आणि मोझरेला चीज आणि खाण्यायोग्य २४ कॅरेट सोन्यासह अति स्वादिष्ट भाज्यांनी भरलेला आहे.”

( हे ही वाचा: Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना )

व्हिडीओ बघून तुमच्या तोंडाला पाणी आले का? बरं, तुम्ही एकटे नाही! व्हिडीओला ६२,००० पेक्षा जास्त लोकांनी लाइक्स करून आपली पसंती दर्शवली आहे. आणि अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तुम्ही हा बाहुबली गोल्ड मोमो ट्राय करणार का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai restaurant selling bahubali gold momo weight 2 kg price 1299 ttg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या