scorecardresearch

एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या, तो VIRAL VIDEO मुंबईचा नव्हे तर पाकिस्तानचा आहे

या व्हिडीओमध्ये पावसात रस्त्यावरून वेगात येणाऱ्या बाईक एका मागोमाग एक घसरून पडत आहेत.

Bike-Accident-Viral-Video
(Photo: Twitter/DeepakNikose3)

मुंबईतला पाऊस अनेकदा रोमँटीक वाटू लागतो. मात्र, यंदा शहरात फारसा पाऊस झालेला नाही. मुसळधार पावसाचा सामना करण्याबरोबरच वाहनचालकांना जोरदार वाऱ्याचाही सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अनेक अपघातांच्या घटनाही घडत असतात. अशाक काही बाईक अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडा इथला असल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र या व्हिडीओची सत्यता जाणून घेतल्यानंतर या व्हिडीओमागचं सत्य समोर आलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक बाईक चालक रस्त्यावर घसरून पडताना दिसत आहेत. सगळीकडे धुवॉंधार पाऊस देखील कोसळत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. पावसात रस्त्यावरून वेगात येणाऱ्या बाईक एका मागोमाग एक घसरून पडत आहेत. बाईकवर बसलेले लोक सुद्धा बाईकवरून खाली रस्त्यावर फरफटत खाली पडताना दिसून येत आहेत. आधी सगळ्यात पुढची बाईक रस्त्यावरून घसरते, त्यानंतर त्यामागची बाईक आणि असं करता करता सगळ्याच बाईक रस्त्यावरून घसरतात.

आणखी वाचा : VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

आणखी वाचा : इटुकला केक कापून साजरा केला मांजरीचा वाढदिवस, VIRAL VIDEO पाहून चेहऱ्यावर गोड स्माईल येईल

हा व्हिडीओ नवी मुंबईतील सानपाडा भागातील असल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून या व्हिडीओमागचं सत्य समोर आलंय. हा व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडाचा नसून तो पाकिस्तानमधल्या कराचीमधला असल्याचं समोर आलंय. पाकिस्तानी ट्विटर युजर अब्दुल अझीझ नोमान यांनी २२ जून रोजी कराचीच्या रस्त्यांचे किंवा इतर पायाभूत सुविधांचे फोटो मागवलेल्या ट्विटला रिप्लाय म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये ५ सेकंदासाठी ‘होंडा’चे शोरूम दिसत होते. कराचीमधील होंडा शोरूमसाठी Google Map वर शोध घेतला असता अगदी त्याच्यासारखंच ठिकाण रशीद मिन्हास रोडजवळ सापडलं.

आणखी वाचा : विमानाने उड्डाण केलं, वेग पकडला आणि अचानक एसी बंद पडला, पुढे काय झालं ते VIRAL VIDEO मध्येच पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL: महिलेला साप चावल्यानंतर पतीने त्याला बाटलीत टाकून हॉस्पिटल गाठलं

व्हायरल व्हिडीओच्या स्क्रीनशॉटसह Google फोटोंची तुलना केल्यानंतर, हे स्पष्ट झाले की शोरूम आणि डावीकडील ‘फ्री पार्किंग’ गेट कराची शहरातील. यावरून हे सत्य समोर आलं की हा व्हिडीओ नवी मुंबईतल्या सानपाडा नसून तो पाकिस्तानच्या कराचीमधला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली अशी एखादी गोष्ट अनेकांना पटकन खरीही वाटू शकते, ही देखील वस्तुस्थिती आहे. असे व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर पसरवून कुणाला काय साध्य करायचंय? हे कळायला मार्ग नाही. पण निदान शिकल्या सवरल्या लोकांनी तरी असे व्हिडीओ फॉरवर्ड करताना एकदा त्याची सत्यता पडताळून पाहावी, अशी अपेक्षा नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai sanpada flyover bike skid accident in rainy season viral video fact check prp

ताज्या बातम्या