Shocking video: मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. लोक देशभरातून मुंबईमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात आणि रमून जातात. पण दुसरीकडे मुंबईवर गुन्हेगारांचं सुद्धा सक्रिय लक्ष असतं त्यामुळे मुंबईमध्ये घडणार्‍या गुन्ह्यांची संख्या देखील जास्त आहे. मुंबईत सध्या गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. शहरात किरकोळ कारणावरून भररस्त्यात, शेकडो लोकांसमोर सर्रास कोयत्याने वार होत आहेत.असाच एक हादरवून टाकणारा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. यामध्ये एक तरुण चक्क कोयता अर्धवट डोक्यात अडकलेल्या अवस्थेत रुग्णालयात पोहचला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण मुंबईतल्या सायन रुग्णालयात उभा आहे. त्याच्या डोक्यात कोयत्यानं कुणीतरी हल्ला केलेला असून कोयता त्याच्या डोक्यात अर्धवट अडकलेला दिसत आहे. यावेळी तो त्याच अवस्थेत स्वत: चालत रुग्णालयात पोहचला आहे. तसेत तो मोबाईलमध्येही बघताना दिसत आहे, शिवाय इकडे तिकडे चालही आहे. व्हिडीओ पाहतानाच अंगावर काटा येत आहे मात्र हा तरुण काहीच झालं नाहीये अशा पद्धतीनं फिरताना दिसत आहे. मुंबईत म्हणे घरातून सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येतो की नाही अशी भीती असते हेच अशा घटनेतून पु्न्हा पुन्हा सिद्ध होत आहे.

पाहा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thechillingpoint नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “बापरे त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करा या अशा लोकांमुळेच चांगल्या मुलांचे नाव खराब होते. अनेकांनी त्या मुलावर काय कारवाई झाली की नाही असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने म्हटले आहे की, घरी आई-वडिल वाट पाहत असतात हे मुलांना का कळत नाही”