scorecardresearch

Premium

Mumbai Vadapav : मुंबईचा चीज वडापाव खाल्ला का? व्हायरल व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटेल

ल्ली वडापावचे अनेक नवनवीन प्रकार सोशल मीडियावर दिसून येतात. तुम्ही कधी चीजने भरलेला वडापाव खाल्ला आहे का?

tasty Cheese Vadapav
मुंबईचा चीज वडापाव खाल्ला का? (Photo : pune_food_blogger/Instagram

Mumbai Vadapav : वडापाव आणि मुंबईचं अनोखं नातं आहे. मुंबईच्या वडापावची नेहमीच चर्चा होत असते. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात लाखो मुंबईकरांच्या पोटाची भूक भागवणारा वडापाव त्यांच्यासाठी खूप खास आहे. हल्ली वडापावचे अनेक नवनवीन प्रकार सोशल मीडियावर दिसून येतात. तुम्ही कधी चीजने भरलेला वडापाव खाल्ला आहे का?
जर तुम्हाला चीज खूप आवडत असेल तर हा वडापाव खाताना तुम्हाला मजा येऊ शकते कारण वडापावबरोबर तुम्हाला चीजचा स्वाद घेता येऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या विले पार्ले परीसरातील या वडापावची चांगलीच चर्चा सुरू आहे. चीजने भरलेला वडापाव किती स्वादिष्ट असतो, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसेल.

हा व्हायरल व्हिडीओ पुण्याच्या एका फुड ब्लॉगरचा आहे. या व्हिडीओत एक तरुण मुंबईच्या विले पार्ले परीसरातील पार्ले वडापावच्या एका दुकानात आलेला दिसत आहे. व्हिडीओत पुढे दाखवले आहे की कशाप्रकारे हा चीजने भरलेला वडापाव बनवला जातो. दुकानदार या तरुणाला गरम गरम चीज वडापाव बनवून देताना व्हिडीओत दिसत आहे. वडापाव खाल्यानंतर तरुण हा वडापाव खूप जास्त स्वादिष्ट असल्याचे सांगतो.

Viral video man mixing noodles with bare hands
अरेरे! नूडल्सचा व्हायरल होणारा ‘हा’ Video पाहून अंगावर अक्षरशः शिसारी येईल! नेटकरीसुद्धा झाले हैराण…
people eat ice in himachal with chutney chilli powder salt and sugar unique food trend goes viral
बर्फावर चिंचेची चटणी, तिखट, मीठ टाकून खातात हिमाचलचे लोक; व्हायरल व्हिडीओ पाहून चक्रावले नेटकरी
mumbai girl made Pink Biryani for Barbie theme party
Mumbai : गुलाबी बिर्याणी! मुंबईच्या तरुणीने बार्बी थीम पार्टीसाठी चक्क बनवली गुलाबी रंगाची बिर्याणी; नेटकऱ्यांनी केले ट्रोल, VIDEO व्हायरल
King cobra sitting on fan viral video
Viral video : बापरे! किंग कोब्रा घेतोय घरातील पंख्याची मजा! सापाचा ‘हा’ थाट पाहून तुम्हीही व्हाल अवाक!

हेही वाचा : Video : चिमुकल्याने चक्क झोपेत केली मध्यरात्री ३ वाजता गणपतीची आरती; मजेशीर VIDEO एकदा पाहाच

pune_food_blogger या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, चीजने भरलेला पिझ्झा सोडा, चीजने भरलेला वडापाव खाणार का?
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “टेस्टी वडापाव” तर एका युजरने लिहिलेय, “कितीही नवीन प्रकार आले तरी जुनं ते सोनं असतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “नवनवीन पदार्थांचा आपण आस्वाद घ्यायला हवा.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai tasty cheese vadapav at parle vada pav centre of vile parle area video goes viral ndj

First published on: 04-10-2023 at 10:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×