Mumbai’s Bandra-Worli sea link lit up ahead of Pran Pratishtha ceremony : अयोध्येतील राम मंदिरात उद्या (ता. २२) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, त्यानिमित्त राम मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानिमित्त अनेक कलाकार, दिग्गज मंडळी अयोध्येत पोहचणार आहेत. या सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचे, चैतन्याचे वातावरण आहे. ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याचप्रकारे मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक देखील भगवान श्रीरामाच्या जयघोषाने उजळून निघाले आहे.

सी-लिंकच्या केबलवर लेझर लाइटद्वारे भगवान श्रीरामाचे चित्र दाखवण्यात आले आहे. हे नयनरम्य दृश्य पाहून तेथून जाणारे लोक भक्तिरसात तल्लीन होत आहेत. खरोखरच हे एक अद्भुत दृश्य असल्याची प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रिजवर लाईट्सद्वारे ‘जय श्री राम’ अशी घोषणा लिहिण्यात आली आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेल्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त वांद्रे-वरळी सी लिंकवर केलेली ही आकर्षक विद्युत रोषणाई जेथून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.यावेळी अनेकांना फोटो किंवा व्हिडीओ काढण्याचा मोह आवरता येत नाहीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्येही ४५ फूट उंच राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे, ज्यावर आकर्षक विद्युत रोषणाईदेखील केली आहे.  श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशातीलच नव्हे तर परदेशातील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सर्वत्र रामनामाचा जयघोष होत असून मंदिराच्या अभिषेकाचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा साजरा केला जात आहे.