अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहे पण आता फोनसुद्धा माणसाची अत्यंत आवश्यक गरज बनली आहे. प्रत्येक जण मोबाइलच्या एवढ्या आहारी गेले आहे की दोन मिनिटे सुद्धा मोबाइलशिवाय राहू शकत नाही. अनेक जण त्यांचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. अनेक जण इन्स्टाग्राम वर रिल्स पाहताना दिसतात. रील पाहायला सुरूवात केली अनेकदा वेळ कसा निघून जातो, हे कळत सुद्धा नाही. अनेकांना इन्स्टाग्रामवर रील पाहण्याचे व्यसन लागलेले दिसून येते. कधीही उठता बसता, कामाच्या ठिकाणी, झोपायच्या आधी रिल्स पाहताना दिसून येतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक रिक्षाचालक रिक्षा चालवताना रील पाहत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मुंबईच्या रस्त्यावरील हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा : Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ मुंबईतील रस्त्यावरील आहे. व्हिडओमध्ये तुम्हाला एक रिक्षाचालक रिक्षा चालवताना दिसत आहे पण त्याचे लक्ष रस्त्यावर नाही तर मोबाइलमध्ये आहे. तो रिक्षा चालवताना रील पाहताना दिसत आहे. रिक्षाचालकाचे फोनमध्ये लक्ष असल्यामुळे त्यांचा अपघात होण्याची पण शक्यता होती. हा व्हिडीओ रिक्षामध्ये बसलेल्या एका महिलेने शूट केला आहे. या महिलेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रिलचे व्यसन प्रवाशांसाठी किंवा इतरांसाठी धोकादायक असू शकते. MH 12 DU 9162″हल्ली रिलचे व्यसन दिवसेंदिवस वाढत आहे. या व्यसनामुळे आपल्या आरोग्यासह आपल्या कामावरही याचा परिणाम होताना दिसतोय.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: याला म्हणतात जुगाड! माठातील पाणी पिण्याची ‘अशी’ सोय पाहून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा Video पाहाच

@kirron_sharrma या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर मुंबई पोलिस वाहतूक पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कारवाई करण्यासाठी लोकेशनची माहिती विचारली आहे.