Viral Video : सध्या मुंबई पुणे शहर आणि शहराजवळच्या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई-पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. या दिवसांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. मुंबई हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं शहर आहे त्यामुळे पावसाळ्यात समुद्र किनारी नागरिकांनी गर्दी करू नये, असे अपेक्षित असते तरीसुद्धा मुंबईकर ऐकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक समुद्रकिनाऱ्यावर उभे आहे पण पुढे असं काही होते की सर्वच घाबरतात. मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया' येथील VIDEO VIRAL या व्हायरल व्हिडीओ गेट वे ऑफ इंडिया येथील आहे. व्हिडीओत तुम्हाला काही लोक ताज हॉटेल समोर समुद्राच्या किनारी उभे असलेले दिसत आहे. हे लोक समुद्राच्या लाटा बघताना दिसत आहे. या व्हिडीओत तुम्हाला पावसाचे वातावरण दिसत असेल आणि समुद्राच्या लाटा जोरजोराने उसळताना दिसत असेल. पुढे तितक्यात एक मोठी लाट समुद्र किनारी येते आणि ही लाट काही लोकांच्या अंगावर पडते. या मोठ्या लाटेमध्ये काही लोक खाली पडतात. धक्कादायक म्हणजे या लोकांमध्ये एक महिला सुद्धा तिच्या लहान बाळाला घेऊन समुद्रकिनारी उभी असते. ती सुद्धा बाळाला घेऊन खाली पडते. सुदैवाने त्यांना कोणालाही कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा :वसईच्या तुंगारेश्वरमध्ये लोणावळ्याची पुनरावृत्ती; दोन तरुण एक दोरी आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह; रेस्क्यूचा थरारक VIDEO व्हायरल पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : Lizard Found Inside Amazon Parcel: धक्कादायक! ॲमेझॉनवरून केली ऑर्डर अन् बॉक्स उघडताच सापडला जिवंत सरडा; फोटो पाहून थरकाप उडेल chal_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "कृपया समुद्रकिनाऱ्यापासून लांब उभे रहा"या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "त्या बाईला नाही माहीत का लहान मुलाला घेऊन उभी होती. सगळे लोक पावसाळ्यातच बाहेर निघतात का?" तर एका युजरने लिहिलेय, "हे खूप धोकादायक आहे. मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी बॅरीकेट लावावे." आणखी एका युजरने लिहिलेय, "व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला" काही युजर्सनी या व्हिडीओवर संताप सुद्धा व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी असे समुद्रकिनारी न जाण्याची विनंती केली आहे.