Mumbai Video : आज देशभरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. सार्वजानिक मंडळांकडून बाप्पांची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केलं जात आहे. सोशल मीडियावर बाप्पााच्या आगमनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही बाप्पााच्या आगमनाचे अनेक व्हिडीओ आजवर पाहिले असेल पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गणपती बाप्पा चक्क शेतकऱ्याच्या बैलगाडीत बसून आला आहे. बाप्पाचे हे अनोखे आगमन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक बैलगाडी दिसेल. या बैलगाडीवर तुम्हाला चक्क बाप्पाची मूर्ती दिसेल. हा व्हिडीओ मुंबईचा असून शेजारी सीएसएमटी स्टेशन दिसत आहे. बाप्पाचं हे अनोखं आगमन पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
starryeyes2054 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर बैलगाडीवर बाप्पा दिसण्याची शक्यता किती आहे?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या वर्षीचे सर्वात सुंदर आगमन” तर एका युजरने लिहिलेय, “हीच आपली संस्कृती आहे असच बापाचं आगमन असावं जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळ्यात भारी बैलगाडी… जुनं ते सोनं च आहे.. तुमचं हजार कोटी च वाहन असलं तरी आमच्या संस्कृती साठी ही बैलगाडी च छान आहे” एक युजर लिहितो, “आपली संस्कृती जपा भारी वाटलं आगमन सोहळा ” तर एक युजर लिहितो, “हे मुंबईतच घडू शकते.”
यंदा गणेशोत्सवात कुठे फिरायला जायचे, कोणत्या मंडळांच्या प्रसिद्ध गणेशमूर्ती बघायच्या, याची योजना तयार करीत आहेत. तुम्ही जर गणपती बघण्यासाठी मुंबईला जात असाल, तर मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तीं बघायला विसरू नका. त्यात मुंबईचा राजा, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा (नरे पार्क), जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल, केशवजी नाईक चाळ, गिरगाव आणि तेजुकाया मेन्शन गणपती इत्यादी गणपती न विसरता पाहा.