सध्या संपूर्ण भारतात कड्याक्याची थंडी पडली आहे. मुंबईतील तापमान देखील बऱ्याच अंशाने खाली उतरले आहे. आज २५ जानेवारीच्या रात्री मुंबईचे तापमान १४ डिग्री सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील वातावरणात होणाऱ्या बदलांची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तसेच, नेटकरी यावर अनेक मजेशीर मीम्स बनवून शेअर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे तापमान अजून घसरणार असल्याची बातमी लोकांपर्यंत पोहोचताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव करून मुंबईच्या हवामानाचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे. मीम शेअर करताना एका नेटकाऱ्याने लिहिले की, ‘यावेळी ज्या प्रकारचा हिवाळा होत आहे, ते पाहता यावेळेस मुंबईत बर्फवृष्टी तर होणार नाही ना?’ तसेच, एका नेटकाऱ्याने म्हटलंय, ‘मुंबईकरांना आता कळतंय थंडी नेमकी कशी असते.’ याशिवाय अनेकांनी मजेशीर मीम्सच्या माध्यमातून मुंबईच्या हवामानावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आ.

कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल

कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न

देशातील इतर भागांच्या तुलनेत मुंबईतील थंडी फारच कमी असते. एकीकडे दिल्लीतील लोकं कडाक्याच्या थंडीने त्रस्त आहेत त्यात मुंबईतील हवामान इतके थंड नाही की त्यामुळे लोकांच्या कामावर परिणाम होऊ शकेल. आयएमडीच्या २४ तासांच्या अनुमानानुसार, मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २५ अंश आणि १४ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आज वातावरण थंड राहणार असून आठवड्याअंती तापमानात हळू हळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे.

More Stories onमुंबईMumbai
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikars suffer due to severe cold memes viral on social media pvp
First published on: 25-01-2022 at 18:35 IST