Dadar Iconic Kabutarkhana Shut Down Video : मुंबईत आजही अनेक ठिकाणी फार पूर्वीपासून सुरू असलेले कबुतरखाने आहेत. या ठिकाणी कबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकलं जातं. कबुतरांना अशा प्रकारे धान्य खायला घातल्यानं पुण्य मिळतं, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे मुंबईतील कबुतरखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. पण, आरोग्याच्या दृष्टीने हे कबुतरखाने आता कायमचे बंद करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई महानगपालिकेला दिले आहेत.

मुंबईत सध्या ५१ अधिकृत कबुतरखाने आहेत, जे तत्काळ बंद करावेत, असा आदेश पालिकेला देण्यात आला आहे. या आदेशामुळे आता दादरमधील कबुतरखान्याची ती ओळख आता कायची पुसली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर दादरमधील कबुतरखान्याचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कबुतरांना खायला घातलेलं धान्य गोळा करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी कबुतरांचा थवा धान्य खाताना दिसणार नाही. हे दृश्य पाहून अनेक मुंबईकर भावूक झाले आहेत.

दादरमधील कबुतरखाना ही जागा अनेक मुंबईकरांना ठाऊक आहे. विशेष म्हणजे ती दादरची एक ओळख होती; पण ही ओळखच आता पुसली जाणार आहे. कबुतरखान्यांच्या जागी असलेली कबुतरांची विष्ठा आणि त्यांची पिसे यांमुळे लोकांना श्वसनाशी संबंधित गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कबुतरखाने बंद होत असल्याने काही जण सरकारचे आभार मानत आहेत. तर, काहींनी माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष्यांना अशा प्रकारे त्रास देत असल्याची भावना बोलून दाखवीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दादरमधील कबुतरखान्याचा हा व्हिडीओ @dadarmumbaikar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, आरोग्याचा विचार केला, तर योग्य निर्णय. पण, नंतर त्या कबुतरखान्याच्या जागी बाकी कोणाचा पुतळा उभा करण्यापेक्षा तेथे सुंदर असे कबुतरांचे सुंदर शिल्प आकारावे. दुसऱ्याने लिहिले की, माणसेसुद्धा कुठेही थुंकतात, घाण करतात. त्यांच्यामुळेही रोगराई पसरते एवढे लक्षात असू द्या… मुक्या प्राण्यांवर नेहमीच अन्याय करत आलोय… त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतीलच… तिसऱ्याने लिहिले की, मुंबईमधून चिमण्या तर घालवल्या ह्यांनी… आता काही वर्षांत कबुतरेपण दिसणार नाहीत. चौथ्याने लिहिले की, मानवाने या पृथ्वीची वाटच लावली आहे म्हणूनच आज तुम्हाला या पक्ष्यांचा त्रास होऊ लागला आहे; बाकी काय नाही.